जवाहर नवोदय विद्यालय,२ फेब्रुवारीला निवड चाचणी प्रवेश परीक्षा

0
8

वाशिम, दि. ३० : केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने वाशिम येथे मुला-मुलींकरिता निवासी स्वरूपाचे जवाहर नवोदय विद्यालय चालविण्यात येत आहे. सन २०१९-२० या वर्षासाठी विद्यालयाच्या इयत्ता ९ वी प्रवेशाकरिता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र www.nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे. ही परीक्षा २ फेब्रुवारी २०१९ रोजी जवाहर नवोदय विद्यालय वाशिम या परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १२.३० वा. या दरम्यान घेण्यात येईल. तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षर्थिनी सोबत प्रवेशपत्र व बॉलपेन (काळा/निळा) सोबत आणावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०७२५२-२३३००२ व www.jnvwashim.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे.