28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक शाळा इमारतीच्या छतावर करतात पालिकेचे विद्यार्थी स्टंट

शाळा इमारतीच्या छतावर करतात पालिकेचे विद्यार्थी स्टंट

0
40

गोंदिया,दि.31ः- गोंदिया शहरात पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या नामाकिंत व शहरातील जुन्या असलेल्या मनोहर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी हे मध्यान्याच्यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांनाच्या डोळ्यात देखत छतावरील भिंतीवर चढून तसेच सळाखीवर चालण्याचा स्टंट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.हा प्रकार बुधवारला शिवप्रतिष्ठानचे प्रमुख दुर्गेश रहागंडाले यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह शाळा प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणून दिली.

30 जानेवारीला दुपारच्या सुमारास इंदिरा गांधी स्टेडीयम जवळील मनोहर म्युनिसिपल शाळेचे काही विद्यार्थी आपल्या जीवाशी खेळत ऊंच इमारतीच्या भिंतीवर स्टंट करीत असल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांचे स्टंट बघून कुठलीही अनुचित घटना कधी घडेल याचा नेम सांगता येणार नाही अशाप्रकारचे स्टंट होते.हा प्रकार दिसताच दुर्गेश रहागंडाले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचे चित्रण करुन जनतेत जागृतीच्या उद्देशाने सोशल मिडीयावर अपलोड करीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कहर उघडकीस आणला. नगर पालिकेच्या या शाळेच्या संबधितांनी यापुढे असे होणार नसल्याची ग्वाही जरी दिली असली तरी यावर नजर ठेवण्याची गरज झाली आहे.