आयुष्यात मोठ बनायचं असेल तर अभ्यासाला प्रर्याय नाही- प्राचार्य गौतम शिंगे 

0
21

बाबरवस्ती शाळेत मिरज येथिल गोसलिया ज्युनिअर कॉलेज एज्युकेशन  कॉलेजची सदिच्छा भेट

जत(राजभक्षर जमादार),दि.24ः-पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा  परिषद प्राथमिक मराठी शाळेस  मिरज येथील श्री.अंबाबाई तालीम संस्थेचे शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर कॉलेज अॉफ एज्युकेशनचे  प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांनी सदिच्छा भेट दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिंगे गौतम होते .प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले.पुलवामा येथील शहिद झालेल्या केंद्रिय राखीव सीमा दल(सी.आर.पी.एफ)जवानानां श्रद्धांजली  वाहण्यात आली. शाळेची माजी विद्यार्थीनी शालू गडदे हिने देशभक्ती गीत सादर केले.

गौतम शिंगे म्हणाले की, शाळेतील मुले शिस्तप्रिय व आज्ञाधारक आहेत. दुष्काळी भागात शाळेच्या भोवती झाडे केवळ लावलीच नाही तर जगवली सुध्दा आहेत.हा स्तुत उपक्रम आहे. शाळेत झालेले बदल पालक व विद्यार्थी , शिक्षक दिलीप  वाघमारे अथक परिश्रमातून झालेला आहे. यांचे कौतुक आहे. विद्यार्थीची प्रगति  अभिनंदनीय आहे . आयुष्यात मोठ बनायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही .शाळेचा होत असलेला विकास व गुणवत्ता या बाबी लक्षात घेऊन त्यांनी शाळेला त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अधिव्याख्याता प्रा उत्तम पांढरे, अधिव्याख्याता प्रा विकास माने   यांनीही  मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सविता मोटे यांनी सुद्धा शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले .  विशाल खाडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

अधिव्याख्याता प्रा.पांढरे यांनी मार्गदर्शन करत असताना अध्यापक विद्यालयातील शिस्त ही विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने रुजवली याबद्दल समाधान व्यक्त केले व मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये स्वयंशिस्तीचे त्याचबरोबर जीवनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले.अधिव्याख्याता प्रा माने सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व त्याचबरोबर स्वयंशिस्त यांचीही ओळख करून दिली विद्यार्थ्यांमध्ये खेळायची विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी दिवस विद्यार्थ्यांसाठी हा नवीन उपक्रम सुचविले.यावेळी प्राचार्य गौतम शिंगे,अधिव्याख्याता उत्तम पांढरे, अधिव्याख्याता विकास माने,मुख्याध्यापक दिलीप वाघमारे,आप्पासो गडदे, सविता मोटे, व विशाल खाडे ,शोभा बाबर ,कृष्णा मोटे, राजू गडदे मिस्त्री , तुकाराम बाबर,शिवाजी बाबर,जानकर,दिलीप बाबर,शालू गडदे, तरुण भारतचे  वार्ताहर रामाण्णा सन्नाळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन  मुख्याध्यापक  दिलीप वाघमारे यांनी केले कार्यक्रमाचे आभार एस. बी मोटे यांनी मानले.