विद्यापीठ स्तरीय स्पध्रेत मुनघाटे महाविद्यालयाच्या महेश मोहुर्लेचे सुयश

0
47

कुरखेडा,दि.14ःःराजीव गांधी शिक्षण व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त इनोव्हेटीव आयडिया, विज्ञान प्रश्नमंजुषा व पापुलर सायन्स प्रदर्शनी स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेत श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचा विद्यापीठ महेश मोहुर्ले यांनी इनोव्हेटीव आयडिया, विज्ञान प्रश्नमंजुषा स्पध्रेत प्रथम तर पापुलर सायन्स प्रदर्शनीत द्वितीय क्रमांक पटाकवून महाविद्यालयाचे नाव लौकीक केले.
महेश मोहुर्ले याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, मार्गदर्शक प्रा. भाष्कर तुपटे यांना दिले आहे. तसेच विविध स्पध्रेत महाविद्यालयातील अश्‍वदीप खोब्रागडे, विशाल जुमनाके, अमर रामटेके, मयूर साखर, संकेत चव्हाण, समीर लक्षणे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. मुनघाटे, उपप्राचार्य खोपे, उपप्राचार्य डॉ. साळुंखे, सर्व प्राध्यापक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.