सार्वजनिक व खाजगी रुग्णालये/ वैदयकीय व्यावसायिकांना क्षयरोगमुक्त भारत करणेसाठी आवाहन

0
27

गडचिरोली,दि.२८:- गेल्या ५० वर्षापासून क्षयरोग नियंत्रणासाठी देशामध्ये सर्वच स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीसुध्दा दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू व अंदाजे १० लाख क्षयरुग्ण दरवर्षी नोंद होत नसल्याचे आणि त्यापैकी बरेच क्षयरुग्ण रोगाचे निदानापासून व औषधोपचारापासून वंचित आहेत. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यामध्ये सन २००३ पासून राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमातंर्गत क्षयरोग तसेच एमडीआर / एक्सडीआर क्षयरोग निदानाच्या अदयावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी नि:शुक्ल उपलब्ध्‍ करुन देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमातंर्गत आजपर्यत निक्षय सॉफ्टवेअर मार्फत ६९,४९९ इतक्या क्षयरुग्णांची नोंद राज्यातील खाजगी वैदयकीय क्षेत्रातून करण्यात आलेली आहे तर शासकीय यंत्रणेमार्फत १,४०,६२७ इतक्या क्षयरुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम – नॅशनल स्टॅटेजी प्लॅन सन २०१७ते २०१५ नुसार कार्यक्रमात उपलब्ध अदयावत सुविधा व औषधोपचार सेवा सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचाच एक भाग म्हणूनन केंद्र सरकारच्या दिनांक १६ मार्च २०१८ अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद कार्यक्रमातंर्ग त ठरविण्यात आलेले आहे. यासाठी अधिसुचना लागू करण्यात आली असून यामध्ये क्षयरोगाचे प्रमाण कमी करणे व त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हा या अधिसूचनेचा मुख्य उद्देश आहे.
समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून योग्य व संपूर्ण औषधोपचार करण्याची नितांत गरज आहे. राज्यामध्ये खाजगी वैदयकीय क्षेत्रामध्ये जवळपास निम्म्याहून जास्त क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. क्षयरुग्णांना पूर्णपणे बरे करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्रसरकारतर्फे कार्यक्रमातंर्गत विविध सुविधा व उपक्रम राबविले जातात. उदा. निक्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांच्या नोंदणीची सोय , नि:शुल्क रोगनिदान व औषधापचार, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत रु. ५०० /- पोषण आहारासाठी ही आर्थिक मदत रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमातंर्गत करणाऱ्या वैदयकीय व्यावसायिकास रु. ५००/- मानधन व क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा रु. ५००/- मानधन , क्षयरुग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहाय्यकास ड्रग सेसिंटिव्ह क्षयरुग्णामागे रु.१०००/- व एमडीआर रुग्णामागे रु.५०००/- मानधन, रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी रु .५००/- मानधन इ. सुविधा देण्यात येत आहेत. क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्याने त्याचे औषधोपचार योग्य व पूर्णपणे घेणे व तो बरा होणे उद्देश आहे.
सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, वैदयकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांची नोंद करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.
क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय (हींींीि://पळज्ञीहरू.ळप/) या संकेतस्थळावर नोंद करावी म्हणजे क्षयरुग्णांना व खाजगी व्यावसायिकांना वरील सगळया सुविधांचा लाभ घेता येईल. दिनांक १६ मार्च २०१८ रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेनूसार क्षयरोग हा एक नोटिफायबल आजार असून त्याविषयी शासनास कळविणे बंधनकारक असल्याचे घोषित केलेले आहे. सर्व सार्वजनिक तसेच खाजगी रुग्णालये, वैदयकीय व्यावसायिक यांनी त्यांच्याकडे निदान झालेले/ उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असल्याने सदर क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना ( जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य वैदयकीय अधिकारी महानगरपालिका इ.) कळविणे बंधनकारक आहे. दिनांक १६ मार्च २०१८ रोजीच्या क्षयरोग अधिसूचनेचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांना व वैदयकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता ( १८६० च्या कलम २६९ आणि २७० च्याअतंर्गत शिक्षा होऊ शकते.
औषधविक्रेत्यांसाठी – आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय , नवी दिल्ली ३० ऑगस्ट २०१३ च्या परिपत्रकाप्रमाणे ङ्कङ्क औषधे व प्रसाधने कायदा १९४५ ङ्कङ्क या मध्ये सुधारणा करुन क्षयरोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्यांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे.
खालील संस्थाकडून क्षयरुग्णांच्य नोटिफिकेशनसाठी शासकीय यंत्रणेकडे माहिती येणे अपेक्षित आहे. सर्व खाजगी दवाखाने / सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिक /वैदयकीय प्रयोगशाळा. सर्व औषध निर्माते. ( फार्मासिस्ट, केमिस्ट आणि ड्रगिस्ट), अशासकीय संस्थामार्फत चालविली जाणारी रुग्णालये वा दवाखाने, सर्व सार्वजनिक दवाखाने /रुग्णालये/ वैदयकीय अधिकारी ,
क्षयरुग्णांना व इतर सर्वाना क्षयरोग व क्षयरोग सोयी सुविधा यांची माहिती देण्यासाठी सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत क्षयरोग हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी या टीबी हेल्पलाईन क्रमांकाचा – १८००११६६६६ निश्चीत लाभ घ्यावा. असे क्षयरोग अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.