मागील वर्षी दहावी परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात प्रथम स्थानी होता. तर यंदा जिल्ह्याची दुसºया स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली.
गोरेगाव तालुक्यातील माडेल कान्वेटचा निकाल ९३.३३ टक्के,किरसान मिशन स्कुल गोरेगाव १०० टक्के,परशुराम विद्यालय मोहगाव बु.६४.०६ टक्के निकाल लागला आहे.प्रथम श्रेणीत २०,द्वितीय श्रेणीत १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.परिक्षेला बसलेल्या ६४ पैकी ४१ विद्याथ्र्यांनी यश संपादन केले.
देवरी-मनोहरभाई पटेल हायस्कूलचा निकाल 68.18 टक्के लागला असून यामध्ये प्राविण्य श्रेणीत 18 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 51, द्वितीय श्रेणीत 55 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनुश्री भेंडारकर हिने 95.60 टक्के गुणे घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याशिवाय सानिया राजेश देशपांडे 94.40 टक्के, आदित्य नेपालचंद बावणथडे 91.40 टक्के आणि अंकिता रोशण शहारे 90.20 टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे.यशस्वी विद्यार्थ्याचे प्राचार्य के.सी.शहारे, उपमुख्याध्यापक गोंडाणे, एसटी हलमारे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.प्रांजली आगाशे तालुक्यात प्रथम
तिरोडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आज (ता.८) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या दहावीच्या परिक्षेत शहीद मिश्रा विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रांजली ओंकार आगाशे हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
विशेष म्हणजे, अंजलीच्या मोठ्या वडिलाची तिन्ही मुली सुद्धा तालुक्यात प्रथम आल्या होत्या. हीच परंपरा प्रांजलीने कायम ठेवली. त्यातील मोठी बहीण एमडीएस तर दोघ्या जुडव्या बहिणी ह्या एमबीबीएस करीत आहेत व प्रांजलीनेही सुद्धा मी पण वैद्यकीय क्षेत्रात वळण्याची ईच्छा व्यक्त केली. प्रांजलीने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वृंद व आई-वडिलांना दिले. अंजलीचे वडील झेरॉक्स दुकान चालवितातत तर आई गृहिणी आहे.
आदिवासी विकास हायस्कूल खजरी/डों. चा 83.24 टक्के निकाल
खजरी:जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल येथील इ.10वी चा निकाल 83.24 %.लागलेला आहे. परिक्षेला बसलेल्या 185 परिक्षार्थ्यापैकी
154 उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्य श्रेणीत 53,प्रथम श्रेणी -87,द्वितिय श्रेणी -13 व तृतिय श्रेणीत – 01 विद्यार्थी आला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष जे.एस.रंहागडाले,
सचिव एन.एन.येडे,प्राचार्य खुशाल कटरे ,उपमुख्याध्यापक बी.आर.देशपांडे,पर्यवेक्षक आर.के.कटरे,सर्व प्राध्यापक,हायस्कूल शिक्षक,मिडल स्कूल शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.
केवळ १४ शाळांनी गाठली शंभरी
दहावीच्या निकालात यंदा आदिवासी बहुल देवरी तालुक्यांने आघाडी घेतली आहे. देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी अनुश्री भेंडारकर हिने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.मात्र यंदा जिल्ह्यातील केवळ १४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तर मागील वर्षी ४३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत शंभर टक्के निकाल देणाºया शाळेच्या संख्येत घट झाली




