30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ बालाघाट जिल्ह्यात दोन नक्षल्यांच्या खात्मा

बालाघाट जिल्ह्यात दोन नक्षल्यांच्या खात्मा

0
38

खेमेंद्र कटरे/गोंदिया,दि.११- शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी तालुक्यातील देवरबेली पोलीस चौकी परिसरातील पुजारीटोला जंगलपरिसरातील मंगळवारला एका घरातून नक्षली बाहेर पडताच हॉक फोर्ससोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षली ठार झाल्याची घटना घडली.यामध्ये नक्षली अशोक उर्फ मंगेश हा छत्तीसगड राज्यातील राजनादंगाव येथील रहिवासी तर नक्षली युवती नंदा ही बस्तर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे बालाघाट पोलीस अधिक्षक अभिषेक तिवारी यांनी म्हटले आहे.
या चकमकीत घटनास्थळावरन वायरलेस सेट,एसएलआर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.या दोन्ही नक्षल्यावर आठ लाख रुपयाचे बक्षिस होते.पोलीस उपमहानिरिक्षक के.पी.व्यकंटेश्वर यांनी चकमकीच्यावेळी ५ वर्दीधारी नक्षल्यांसोबत चकमक झाल्याचे म्हटले आहे.यापैकी ३ नक्षली पसार झाले असून जंगलात सर्च मोहिम सुरु करण्यात आली आहे.
गेल्या वर्षापासून नक्षल्यांनी बालाघाट-मंडला जिल्ह्यात पुन्हा सक्रियता दाखवणे सुरु केली असून लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लांजी परिसरात अपक्ष उमेदवाराचे वाहन जाळले होते.तर त्याआधी कान्हा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प परिसरात नक्षल्यांच्या हालचाली वाढल्या होता.या घटनेने पुन्हा नक्षली मध्यप्रदेशातील बालाघाट,मंडला भागात तीन दलम सक्रीय आहेत.यामध्ये टांडा दलम,दरेकसा दलम व मलाजखंड दलमचा समावेश आहे.बालाघाट जिल्ह्यात याआधी सात वर्षापुर्वी नक्षल पोलिस चकमक झाली होती.त्यावेळी सुध्दा नक्षली युवक युवती मारले गेले होते