शिक्षकासाठी हेटीटोल्याच्या शाळेला कालपासून कुलूप

0
9

देवरी,दि.20ः- गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचा ढिंडोरा पिटणार्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पालकांच्या मागणीवर शिक्षक उपलब्ध करुन न देता आल्याने पालकांनी शाळेला कालपासून कुलूप ठोकले तरी प्रशासनीक अधिकारी मात्र गप्प बसले आहेत.तालुक्यातील हेटीटोली(मुल्ला) येथे जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ते 4 पर्यंतची शाळा असून 45 पटसंख्या आहे.या पटसंख्येला शिकविण्यासाठी मात्र एकच शिक्षक कार्यरत आहे.या गावातील पालकानी पंचायत समितीकडे शिक्षकाची मागणी केली.मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पालकांनी 19 जुर्ले रोजी शाळेलाच कुलूप ठोकले.शुक्रवारी ठोकलेला कुलूप आज शनिवारही उघडण्यात आलेला नाही,यावरुन शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे किती गुणवत्तापुर्ण लक्ष देत आहे,यावरुन दिसून येत आहे.