संख येथे आर.के.पाटील महाविद्यालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

0
29

संख,दि.20(वार्ताहर) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या उच्चशिक्षणाचा लाभ  या भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन जत तालुक्यांतर्गत येणाऱ्या संख येथील राजे रामराव महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. व्ही एस ढेकळे यांनी महाविद्यालयाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले.

ते स्थानिक आर.के.पाटील महाविद्यालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  बोलत होते. यावेळी संस्थापक तथा माजी सभापती आर.के.पाटील, प्राचार्य के.एस.इटेकर, प्रा.आर.बी.पाटील,प्रा.वठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. शालिनी गडदे,मयुरी तटीतेली या विद्यार्थींनी स्वागत गीत गायिले. प्रास्ताविक प्राचार्य श्री.कोळेकर यांनी केले.
प्राचार्य ढेकळे पुढे  म्हणाले,जत तालुक्यात एकच महाविद्यालय असल्याने पूर्व भागातील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वचिंत राहत होते. त्यांना चांगली सोय झाली आहे. शिक्षणामुळे प्रगती निश्चित आहे. त्यामुळे आपल्या कुंटुबासह गाव,भाग,राज्य,देशाचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षण घेऊन सक्षम नागरिक बना, असे ही  ढेकळे म्हणाले.
आर.के.पाटील म्हणाले, या भागातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी माझा सतत प्रयत्न असतो.माझ्या भागातील विद्यार्थ्यासाठी उच्चशिक्षणाची सोय संख येथे उपलब्ध केली आहे.यापुढेही वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधा देण्यात प्रयत्न करू
यावेळी प्रा.शिवाजी कुलाळ,किरण आर.पाटील सर ,अजय बिराजदार,तम्मा बागेळी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन कु.वाघोली,कु.कुलकर्णी यांनी तर आभार प्राध्यापक इंगळे यांनी मानले.