शिक्षक व वर्गखोल्यासांठी विद्यार्थ्यांसह गावकरी पोचले पंचायत समितीला

0
21

संतोष रोकडे/ अर्जूनी/,दि.22ः-तालूक्यातील मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेला दोन शिक्षक देण्यात यावे तसेच वर्गखोल्यांच्या मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थी व पालकांनी  सोबत घेत शाळेला कुलूप ठोकून पंचायत समितीवर धडक दिली. विद्यार्थीच्या शिक्षक व वर्गखोली मागणींच्या घोषणांनी पंचायत समिती कार्यालय दुमदुमून गेले होते.दरम्यान पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर,गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाड प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाठे यांनी गावकरी व शालेय व्यवस्थापन समितीच्या निवेदनाची दखल घेत येत्या 26 जुर्लेपर्यंत 2 एैवजी 1 पदवीधर शिक्षक उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन दिले.तसेच इतर शाळेत शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यावेळी दुसरा शिक्षक देण्यासोबतच वर्गखोल्यासांठी जिल्हा परिषदेकडे आधीच पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती दिली.त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे,शालेय व्यवस्थापन समिती अद्यक्ष मुनेश्वर शहारे,क्षिरसागर ऱखडे,ऋषी कोवे,मनिषा शहारे,दयाराम सोनवाने,देवीदास पर्वते आधी पालक हजर होते.