महावितरणचे संचालक दिनेशचंद्र साबू यांचेकडून भंडारा आणि गोंदियाचा आढावा

0
12
भंडारा, दि.22:-ग्राहकांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी देखभाल व दुरुस्तीच्या कार्याचे नियोजन करून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावनी करण्यासोबतच ट्रीपिंगचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या सुचना महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांनी केले. गोंदिया आणि भंडारा मंडलातील संचलन व सुव्यवस्था कामांचा आढावा घेतांना ते बोलत होते.
देखभाल व दुरुस्तीच्या निविदांना कंट्राटदारांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यास त्यापैकी अधिकाधिक कामे बेरोजगार अभियंत्यांना देण्यावर विशेष भर देतांना त्यांनी महावितरणने देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला असल्याने वीजग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी त्याचा योग्य वापर करण्यासोबतच पुर्व विदर्भासाठी महावितरणतर्फ़े राबविण्यात येत असलेल्या ‘ईस्ट विदर्भ’ योजनेतील कामे जलदगतिने पुर्ण करा, जिल्हा नियोजन समितीतर्फ़े उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधिचा विनिमय योग्यरित्या करण्याच्या सुचनाही दिनेशचंद्र साबू यांनी यावेळी दिल्या.
महावितरणकडे मीटरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज जोडण्या तत्परतेने द्या, मालमत्तेचे भांडवलीकरण नियमितपणे करा, एमआयडीसी भागातील पायाभुत सुविधांच्या सशक्तिकरणासाठीचे प्रस्ताव त्वरीत पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. याबैठकीला त्यांच्यासमवेत नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल याशिवाय गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, अधीक्षक अभियंता सम्राट वाघमारे, नीरज वैरागडे व ओंकार बारापात्रे यांचेसह सर्व कार्यकारी अभियंते, वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर संचालक (संचलन) यांनी भंडारा येथील विद्युत भवन परिसरात आयपीडीएस योजने जीआयएस तंत्रज्ञानावर आधारीत 33 केव्ही उपकेंद्राला तसेच मुजबी येथील ‘ईस्ट विदर्भ’ योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या 33 केव्ही उपकेंद्राला भेट देत तेथील कामाची पाहणी केली. यावेळी दिनेशचंद्र साबू आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भंडारा येथील उपकेंद्राच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांच्या भंडारा भेटीदरम्यान तेथील औद्योगिक ग्राहकांनी त्यांची भेट घेतली यावेळी साबू त्यांचेशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा करून उद्योगांच्या समस्या जाणून घेत त्यांची त्वरीत सोडवणुक करण्याच्या सुचना सर्व संबंधितांना केल्या