29.8 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर भरण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीचे अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर भरण्याचे आवाहन

0
39

वाशिम, दि. २० : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in  हे पोर्टल माहिती व तंत्रज्ञाना यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनेचे अर्ज १ ऑगस्ट २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आले आहेत.सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत देण्यात आला आहे. तरी त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याविषयी अवगत करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.