आसोली ग्रामसभेने पाठविला ओबीसी जनगणनेचा ठराव

0
8

आमगाव,दि.२०ः-स्वतंत्र भारतात ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यामुळे शेती,शिक्षण आरोग्य,नोकरी,उद्योग व्यापारात ओबीसी उत्थानाचे सवैंधानिक अधिकार प्राप्त झाले नाहीत.ही बाब लक्षात येताच आसोलीतील युवकांनी स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत सन २०२०-२१ मध्ये होत असलेल्या भारतीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी हा ठराव प्रधानमंत्री यांना पाठविले.यासोबतच ओबीसी समाजाला संख्येप्रमाणात आरक्षण,शिक्षणप्रतिपूर्ती शुल्क-शिष्यवृत्ती,वस्तीगृह,एससी,एसटी प्रवर्गातील शेतकèयाप्रमाणे शेतीच्या विविध योजनांचा लाभ मिळणे,ओबीसीचा नोकरीतील अनुशेष भरणे,खासगी क्षेत्रात ही आरक्षण देऊन सामाजिक न्याय करणे आदी मागण्यांचा ठराव ग्रामसचिव चौव्हाण यांच्यामार्फेत ओबीसी सेवा संघ आसोलीचे अध्यक्ष भूमेश शेंडे,मनोज हरिणखेडे,हरिष राऊत,योगेश हरिणखेडे,देवेंद्र पारधी,अनिल बघेले,रqवद्र कटरे,रविकांत भगत यांच्या पुढाकाराने सरपंच रामेश्वर शेंडे,रामकृष्ण बघेले,शिवलाल कटरे,दिनदयाल बघेले,भागवत बावणे,रामचंद्र हरिणखेडे,गेंदलाल ठाकरे आणि गावकरी बांधवांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे ठराव पाठविण्यात आले.