30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक हिरडामाली जि.प.शाळा तंबाखू मुक्त शाळा घोषित

हिरडामाली जि.प.शाळा तंबाखू मुक्त शाळा घोषित

0
53

गोरेगांवदि.17ः- पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या तालुक्यातील हिरडामाली येथील भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी आंतराष्ट्रीय जि.प.पुर्व माध्यमिक शाळेला आज 17 सप्टेंबरला तंबाखू मुक्त शाळा म्हणून जाहिर करण्यात आले.याकरीता शाळेच्या परिसरात विद्यार्थी ,शिक्षक व पालकांच्या दरम्यान जाणिव जागृतीकरीता बालसभा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमात पदविधर शिक्षिका नाननबाई बिसेन द्वारा दिग्दर्शित व्यसनमुक्ती वरीला नाटीका विद्यार्थ्यांनी सादर केली.याप्रसंगी पदविधर शिक्षक सुरेश बघेले,स.शि.ए.डी.तितिरमारे,स.शि.व्हि.टी.पटले,स.शि.सौ.छाया पारधी,स.शि.कु.साधना पारधी,स.शि.के.एस.पटले प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार स.शि.व्हि.टी.पटले यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परीश्रम घेतले.