25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home शैक्षणिक जि.प.कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरा-सरपंच अनिरुद्ध शहारे

जि.प.कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरा-सरपंच अनिरुद्ध शहारे

0
32

नवेगावबांध,दि.28ः येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राध्यापकांची तीन पदे रिक्त असून, कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शैक्षणिक कारभार अस्थायी प्राध्यापकांकरवी चालविला जात आहे. असे असताना, कायमस्वरूपी रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी केली आहे. अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया यांना दिले आहे.

नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी व बारावी येत्या दोन तुकड्या कार्यरत आहेत. या तुकड्यांना अस्थायी स्वरूपाचे प्राध्यापक सध्या शैक्षणिक कार्य करीत आहेत. एकही स्थायी स्वरूपाचे प्राध्यापक नाहीत. स्थायी प्राध्यापक अभावी येथील कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक दर्जा खालावण्याच्या मार्गावर आहे.या कनिष्ठ महाविद्यालयात 3 पदे मंजूर असून, एक पद रिक्त होते, एक प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. तर एका प्राध्यापकांची वडेगाव( तिरोडा) येथे स्थानांतरन झाले आहे. सध्या या महाविद्यालयात तीनही पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यावर याचा परिणाम होत आहे. दुसरीकडे खासगी संस्थांची चार कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे हे कनिष्ठ महाविद्यालय मोडकळीस येण्याची भीती सरपंच शहारे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हे तीनही रक्ती रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी सरपंच शहारे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया यांना केली आहे.