गोंदिया,दि.28:- संविधान दिनानिमीत्त संविधान मैत्री संघातर्फे स्थानिक डॉ. आंबेडकर प्रतिमा चौक परिसर, नवीन प्रशासकीय इमारतीजवळ सर्व पक्षीय संघटनांचे संयुक्त चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी 26 नोव्हेंबर 2019 ते 26 जानेवारी 2020 पर्यंत संविधान मैत्री संघातर्फे विशेष व्दिमासिक संविधान जनजागरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला
चर्चासत्र कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावनेचे सामुहिक वाचन शपथ पठनाने करण्यात आली. चर्चासत्रात विचार मांडताना मान्यवरांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी संविधान सभेत दि.25 नोव्हेंबर 1949 ला अंतिम भाषणात दिलेला इशारा की देशहित सर्वोपरी असले पाहिजे, पण वर्तमान परिस्थितीत देशात विपरीत सुरु आहे. राजकिय विवेकाचा वापर करुन आपापसात सामन्जस्य निर्माण होत नाही. व्यक्तिगत स्वार्थाचे, पद, सत्ता, संपत्तीकरिता संघर्ष हे लोकशाहीस बाधक असुन देशहीत विरोधी आहे. सत्तेसाठी काहीही समाज विरोधी कृत्य असू शकते का? मग संविधान नितीमत्तेच्या तत्वाचे काय? संविधान दिनानिमित्त, सर्व लोकप्रातिनिधीना (ग्रामपंचायत पासून तर संसद पर्यंतच्या ) बाबासाहेबांचे हे 25 नोव्हेंबर 1949 चे भाषण, संविधानाची शपथ व महत्व आणि नागरिक म्हणून संविधानिक कर्तव्ये नीटपणे समजावून सांगणे आवश्यक झाले आहे. भारत सरकारने यासाठी विशेष कार्यक्रम राबवीणे गरजेचे आहे.परंतू त्यांच्या कडुन अपेक्षा न करता आपणच विविध संघटनांच्या सोबतीने, विविध माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. समतेच्या मार्गाने भारतीय संविधानाची गरज आणि त्याचे महत्व या दृष्टीने विचारपूर्वक चिंतन करण्यासाठी फक्त पारंपारिक रित्या मनोरंजन- भाषणाकरिता म्हणून २६ नोव्हेंबर “संविधान दिन” साजरा करणे हा हेतू न ठेवता, त्या दिवसाची “व्याप्ती व महत्त्व” याचे सत्य जाणून घेण्यासाठी, समाजाच्या हितासाठी विचार मंथन, चिंतन मनन करण्यासाठी सर्व मिळून एकत्र येण्याची खरी गरज आहे.
चर्चासत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे डॉ. नामदेव किरसान होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बामसेफचे शब्बीर पठाण, ओबिसी सेवा संघाचे प्रा.बी.एम. करमकर, सावन कटरे, बीआरएसपी चे प्रा.डी.एस. मेश्राम, कम्युनीस्ट पार्टीचे मिलींद गणवीर, आम आदमी पार्टी चे पुरुषोत्तम मोदी, प्रमीला सिंद्रामे, अरुण चौहान, उच्चशिक्षित स्कॉलर्स मधून ड़ॉ. राजेन्द्र वैद्य, डॉ. जतीन वाहने, प्रा. रोमेन्द्र बोरकर, अनिल गोंडाने, तिर्थराज उके, सोमेंद्र डहाट,डाॅ.झामसिहं बघेले,पी.जी.कटरे,डेमेंद्र रहागंडाले, उपस्थीत होते. संचालन महेंद्र कठाणे यांनी केले तर आभार पौर्णिमाताई नागदेवे यानी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता युवा बहुजन मंचचे सुनिल भोंगाडे, रवी भांडारकर, आदेश गणवीर, राहुल खोब्रागडे, राजेश्वरी रहांगड़ाले, बाळू मोटधरे, समता सैनिक दल, पाटलीपुत्र व मैत्रीय बुद्ध विहार महिला मंड़ळ, आदेश डेकोरेशनवाले यानी सहकार्य केले.





