29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home शैक्षणिक मॉडेल कॉन्वेंट आणि सायन्स जुनियर कॉलेजमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा

मॉडेल कॉन्वेंट आणि सायन्स जुनियर कॉलेजमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा

0
67

गोरेगाव,दि.07ःयेथील मॉडेल कॉन्वेंट आणि सायन्स जुनियर कॉलेज गोरेगांव येथे महापरिनिर्वाण दिन डॉ. बाबासाहेब अम्बेडकर यांच्या पावन स्मृतिस अभिवादन करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संचालिका श्रीमती सुरेखाताई कटरे तसेच सहाय्यक शिक्षिका श्रीमती नमिता ठाकुर उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यानी भाषण तसेच गीतांच्या माध्यमातून डॉ भीमराव आंबेडकर यांच्या आठवणिंना उजाळा दिला. श्रीमती नमिता ठाकूर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. अध्यक्ष आर.डी.कटरे यांनी अनेक उदाहरण देत कशाप्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या प्रत्येक नागरिकांसाठी भरीव कामगिरी केली याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांनी देखील त्यांचा आदर्श घेत आपण देखील उच्च शिक्षण घेऊन समाज कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती साखरे मॅडम तसेच आभार श्रीमती वंजारी मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

नवेगावबांधःः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील  आनंद बुद्ध विहार समिती चान्ना/बा. द्वारा आयोजित महापिनिर्वाण दिन कार्यक्रमात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.यावेळी पाहुणे म्हणून किशोर तरोणे जि.प. सदस्य गोंदिया, लोकपाल गहाणे,‌अल्काताई मरसकोल्हे सरपंच, मोरेश्वर सोनवाने, हेमराज फुंडे, अंताराम राखडे, सुप्रिया रामटेके, रविंद्र खोटेले , तुकाराम शेंडे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक तुकाराम शेंडे यांनी केले. संचालन व आभार रघुनाथ शेंडे यांनी केले.

भाजप जिल्हा कार्यालयः-भारत रत्न, विश्वभूषण परमपूज्य बाबा साहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाणदिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यालयात श्रधांजली अर्पित करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती विश्वजित डोंगरे,पंकज रहांगडाले, जिल्हा अध्यक्ष, भाजपा.युवा मोर्चा,सुनील केलंनका अध्यक्ष भाजपा शहर,गोल्डी गावंडे,गजेंद्र फुंडे, मिलींद बागडे,अजित मेश्राम व कार्यकर्ते उपस्थि होते.

blank