25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांनी दैनिक व्यवहारात सुध्दा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा-माजी खासदार बोपचे

विद्यार्थ्यांनी दैनिक व्यवहारात सुध्दा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा-माजी खासदार बोपचे

0
38

गोरेगांव,दि.23ः विज्ञान विषय अध्ययनात ,कोणत्याही काल्पनीक संकल्पना वाव नसतो.प्रत्येक घटनांना वैज्ञानिक आधाराची पार्श्वभूमी असते.त्यातून सत्यता प्राप्त होते.
विज्ञान विषयाचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावशाली व आकर्षक होण्यासाठी ज्या शैक्षणिक संसाधनाची आशक्यता असते,त्यांची उपलब्धता प्रत्येक शैक्षणिक संस्थामध्ये असने गरजेचे असते.यावर शिक्षण विभागाच्या अधिकार्यांकडून वारवांर मुल्यांकन होणे तेवढेच महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शालेय जिवनापासूनच आपल्या दैनंदिन व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा असे आवाहन माजी खासदार तथा स्थानिक शाळेचे संस्थापक डाॅ.खुशाल बोपचे यांनी केले.
ते गोरेगांव तालुका विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.गोरेगांव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण विभाग गोरेगांवच्या वतीने 20 ते 21 डिसेंबरपर्यंत परशुराम विद्यालय मोहगांव(बुज.)येथे करण्यात आले होते. उदघाटन गोरेगांव पंचायत समिती चे सभापती सौ.माधुरीताई टेंभरे यांच्या हस्ते व माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी गोरेगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर,मोहगांवचे सरपंच श्रीमती हेमलता हरिणखेडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे, बी.आर.सी गोरेगांवचे गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे,केन्द्रप्रमुख वाय.एल.रंहागडाले उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांचे 60 प्रयोगाच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन करण्यात आले.मुल्यांकन गोरेगांव येथील जगत विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.गजाधर भगत,डाॅ.बाळकृष्ण परशुरामकर ,डाॅ.जे.आय.ठाकूर यांनी केले.उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेडारकर ,संचालन विषयतज्ञ सुनिल ठाकुर व आभार प्रदर्शन विषयतज्ञ ओमप्रकाश ठाकरे यांनी केले.blank
बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर होते.मुख्य बक्षिस वितरक म्हणून स्थानीक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गोरेगांव केंद्राचे केंद्रप्रमुख बी.बी.चौधरी उपस्थित होते.प्रास्ताविक विषय तज्ञ भाष्कर बहेकार यांनी केले.विज्ञान प्रदर्शन परिक्षणानुसार, प्राथमिक विद्यार्थी गटातून
प्रथम क्रमांक गोरेगांव येथील माॅडेल कानव्हेंटचा खुशाल चौधरी,द्वतिय-गोरेगांव येथील श.जा.ति.जि.प.हायस्कूलचा प्रणय हुमणे,तृतिय क्रमांक शहारवानी येथील स्व.ब्रिजलाल कटरे हायस्कूलचा अंकित पटले याने पटकावला.तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक गोरेगांव येथील श.जा.ति.जि.प.हायस्कूलचा महेंद्र चौरागडे,द्वितीय क्रमांक सोनी येथील एम.आय.पटेल हायस्कूलची कु.उषा पटले व तृतिय क्रमांक  मोहगांव येथील परशुराम विद्यालयची कु.भाग्यश्री पटले हिने पटकावले.
प्राथमिक शिक्षक गटातून  सिलेगांव येथील जि.प.प्रा.शाळेचे स.शि.एस.आर.साबळे , माध्यमिक शिक्षक गटातून मोहगांव येथील परशुराम विद्यालयाचे सौ.भारती खेमेंद्र कटरे तर प्रयोगशाळा सहाय्यक गटातून चोपा येथील रविंद्र विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक एन.एम.भड यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींची अव्वल म्हणून निवड करण्यात आली.
बक्षिस वितरण कार्यक्रमाचे संचालन विषयतज्ञ ओमप्रकाश ठाकरे,आभार प्रदर्शन गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे यांनी केले.प्रदर्शन यशस्वितेसाठी बी.आर.सी गोरेगांव येथील सर्व विषयतज्ञ,स्थानिक विद्यालय येथील सर्व शिक्षक- कर्मचारी यांनी सहकार्य केले.