तीन विद्यापीठांची आज राज्यस्तरीय कार्यशाळा

0
13

बीएड, एमएड : अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी नवा प्रयोग
चंद्रपूर ,दि.२८- : एनसीटीई रेगुलायजेशन-२0१४ नुसार एमएड आणि बीएड या विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाची तयारी आणि अंमलबजावणीसाठी गुरूवारी २८ मे रोजी सकाळी १0.३0 वाजता स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली आहे. जनता शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गडचिरोली व नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.अशोक जीवतोडे हे या कार्यशाळेचे आयोजक आहेत.
गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि संत गाडगोबाबा अमरावती विद्यापीठ या तीन विद्यापीठांनी एकत्रित येऊन हा उपक्रम आखला आहे.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू जी.एस. पाराशर राहणार असून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद््घाटन होईल. गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. आर.एस. चंदनपाठ, नागपूरचे अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर भुसारी, अमरावती विद्यापीठाचे पदव्यत्तर विभाग प्रमुख डॉ. जी.एस. गुल्हाणे, नागपूरचे डॉ. भीमराव गोटे, नागपूर विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. राजश्री वैष्णव आणि गोंडवाना विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे डॉ. दिलीप जयस्वाल उपस्थित राहणार आहेत.