औरगांबादेत एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात 14 जणांना अटक

0
11

औरंगाबाद,दि.7: औरंगाबादमध्ये आज सकाळी एमपीएससीचा पेपर फुटल्याचे प्रकरण उघडकीस आले. आज एमपीएससीद्वारे कर सहाय्यकपदासाठी पेपर घेतला जात होता. मात्र त्याआधीच हा पेपर फुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र याप्रकरणी 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.तसेच ज्या 8 विद्यार्थांना पेपर देण्यात आले होते त्यांचीही विचारपूस करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

औरंगाबादच्या एन-४ भागातून याप्रकरणी १४ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. एका व्हॉटसअॅप क्रमांकावरुन मुंबईतून एक पेपर आला होता. आठ विद्यार्थ्यांना हा पेपर सोडविण्यासाठी देण्यात आला होता. औरंगाबादच्या क्राईम ब्रांचला याबाबत माहिती मिळताच त्यांनी धाड टाकून 14 जणांच्या मुसक्या आवळल्या.आठ विद्यार्थींना जो पेपर देण्यात आला होता तोच आजचा पेपर आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. तसेच हा पेपर ज्या नंबरवरुन आला त्याचाही पोलीस शोध घेत असून त्याच्या म्होरक्यापर्यंत पोहचण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे.