प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाचे सुयश

0
6

गोंदिया दि. २६: महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्यावतीने घेण्यात येणार्‍या विविध चित्रकला परिक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यात येथील प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयातील फाऊंडेशन वर्गातून वैभव मेश्राम याने प्रथम, विजय कटरे याने द्वितीय तर लोकेश नखाते, गुरूदास भेलावे, प्रिया पांडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
तर एटीडी प्रथम वर्गातून मोना जिवतोडे हिने प्रथम, किरण बानेवार हिने द्वितीय निलम आगाशे, किशोरी चापले, प्रिती पारधी, सपना संतानी, संजय हट्टेवार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.