निवडणुकीला सामोरे जाण्यास तिरोडा प्रशासन सज्ज

0
8

तिरोडा दि. २६: गोंदिया जिल्हा परिषद व तिरोडा पंचायत समितीच्या सदस्य पदांसाठी येत्या ३0 जून रोजी मतदान होणार आहे. यात जि.प. साठी सात तर पं.स. करिता १४ उमेदवार निवडून येणार आहेत. तिरोडा तालुक्यात निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज असून तालुक्यातील एक लाख १४ हजार ५0५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरूष मतदार ५७ हजार ७१५ तर स्त्री मतदार ५६ हजार ७९0 असून एकूण मतदान केंद्रे १५0 आहेत.
तिरोडा तालुक्यात जि.प. क्षेत्राच्या सात आणि पं.स. च्या १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. जि.प. च्या सात गटांसाठी गट क्रमांक ३0 ते ३६ व पं.स. करिता ५९ ते ७२ गण तयार करण्यात आले आहेत.
जि.प. अर्जुनी क्षेत्रात एकूण मतदार १५ हजार ८१९ असून यात पुरूष मतदार सात हजार ७७३ व महिला मतदार आठ हजार ४६ आहेत. सेजगाव क्षेत्रात एकूण मतदार १७ हजार १0८ असून पुरूष आठ हजार ४७३ तर महिला आठ हजार ६३५, सुकडी-डाकराम क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार २३९ असून पुरूष सात हजार ९२३ व महिला आठ हजार ३१६, ठाणेगाव क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार ९४१ असून पुरूष आठ हजार ५४५ व महिला आठ हजार ३९६, कवलेवाडा क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार ७८0 असून पुरूष आठ हजार ३५0 व महिला आठ हजार ४३0, सरांडी क्षेत्रात एकूण मतदार १५ हजार ४९८ असून पुरूष सात हजार ७३९ व महिला सात हजार ७५९ आणि वडेगाव जि.प. क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार १२0 पैकी पुरूष मतदार सात हजार ९८७ व महिला मतदार आठ हजार १३३ आहेत.
तिरोडा पं.स.च्या १४ सदस्य निवडणुकीसाठी जि.प. क्षेत्राच्या मतदारांना मतदान द्यायचे आहे. अर्जुनी गटाच्या परसवाडा पं.स. क्षेत्रात एकूण मतदार सात हजार ८३0 असून पुरूष मतदार तीन हजार ८३६ तर महिला मतदार तीन हजार ९९४ व अर्जुनी पं.स. क्षेत्रात सात हजार ९८९ एकूण मतदारांपैकी पुरूष तीन हजार ९३७ व महिला चार हजार ५२ आहेत. सेजगाव गटातील सेजगाव पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार आठ हजार ४७७ असून पुरूष चार हजार २१८ व महिला चार हजार २५९, चिरेखनी पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार ६३१ असून पुरूष चार हजार २५५ व महिला चार हजार ३७६ आहेत. सुकडी-डाकराम गटाच्या इंदोर खु. पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार ५५७ असून पुरूष चार हजार १६८ व महिला चार हजार ३६९ आहेत. ठाणेगाव जि.प. क्षेत्रातील चिखली पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार २२२ असून पुरूष चार हजार १९१ व महिला चार हजार ३१ आहेत.
कवलेवाडा जि.प. क्षेत्रातील कवलेवाडा पं.स. गणात एकूण मतदार आठ हजार १७९ असून पुरूष चार हजार ७५ व महिला चार हजार १0४ आहेत. सरांडी गटाच्या सरांडी गणात एकूण मतदार सात हजार ५४९ असून पुरूष तीन हजार ७७६ व महिला तीन हजार ७७३, केसलवाडा गणात एकूण मतदार सात हजार ९४९ असून पुरूष तीन हजार ९३३ व महिला तीन हजार ९८६, सुकडी डाकराम पं.स. गणात एकूण मतदार सात हजार ६८२ असून पुरूष तीन हजार ७५५ व महिला तीन हजार ९२७, ठाणेगाव गणात एकूण मतदार आठ हजार ७१९ असून पुरूष चार हजार ३५४ व महिला चार हजार ३६५, मुंडीकोटा गणात एकूण मतदार आठ हजार ६0१ असून पुरूष चार हजार २७५ व महिला चार हजार ३२६, वडेगाव गटांतर्गत येणार्‍या वडेगाव गणात एकूण मतदार आठ हजार ६३९ असून पुरूष चार हजार ३0७ व महिला चार हजार ३२, कोयलारी गणात एकूण मतदार सात हजार ४८१ असून पुरूष मतदार तीन हजार ६८0 तर महिला मतदार तीन हजार ८0१ आहेत.तिरोडा तालुक्यातील १५0 मतदान केंद्रांसाठी ६00 व इतर शंभराच्या वर असे एकूण ६00 ते ६५0 अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशासनाने कामावर लावले आहे.