भंडारा/चंद्रपूर,दि.19ः-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा शाखा,चंद्रपूरच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रेखाताई कारेकर,सभापती राजुभाऊ गायकवाड,संजय जोल्हे, प्र.उप मुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांची भेट विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.सोबतच ओबीसी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत निवेदन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची प्रत्यक्ष भेट घेत चर्चा करण्यात आली.निवेदनात जि.प.अंतर्गत कार्यरत शिक्षकांची विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती सेवाजेष्ठतेनूसार करण्यात यावे.जि. प.अंतर्गत जि.प शाळेतील वर्ग 1 ते 8 च्या सर्वांना गणवेश मिळतो.मात्र ओबीसी बिपीएल नसणाऱ्या विध्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही ते विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून किमान एक गणवेश ग्रामपंचायत तर्फे 15 व्या वित्त आयोगातून किंवा जि.प फंडातून देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शाम लेडे,रामराव हरडे,देवराव दिवसे, प्रदिप पावडे,राजू हिवंज,कु.रजनी मोरे,पोर्णिमा मेहरकुरे,सौ.अर्चना माशीरकर,मंजूषा फुलझेले इ.ओबीसी बांधव उपस्थित होते.
भंडारा:- जिल्हा परिषद शाळांतील वर्ग १ ते ८ वी पर्यंत शिकणाèया सर्व ओबीसी व ओपन प्रवर्गातील विद्याथ्र्यांना मोफत शालेय गणवेशाचा लाभ जिल्हा परिषद शेष फंडातून देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. तसे निवेदन जि.प. अध्यक्षांना दिले आहे. समग्र शिक्षा अभियानातून (सर्व शिक्षा अभियानातून) शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळेला वर्ग १ ते ८ वी पर्यंतच्या विद्याथ्र्यांना सर्व मुली व अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी चे सर्व मुलांना शासनामार्फत मोफत शालेय गणवेश पुरविला जातो. परंतू ओबीसी व ओपनच्या विद्याथ्र्यांना गणवेश पुरविला जात नाही. सदर विद्यार्थी गणवेशापासून वंचीत आहेत. सदर विद्याथ्र्यांमध्ये गणवेश मिळत नसल्याने त्यांच्यात न्युनगंड निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्ग १ ते ८ वी पर्यंत शिकणाèया सर्व ओबीसी व ओपन प्रवर्गातील सर्व विद्याथ्र्यांना मोफत गणवेश देण्यात यावा.सदर विषयांचे गांभिर्याने लक्षात घेवून विषय जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंजूर करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा संयोजक डॉ. मुकेश पुडके, जिल्हा समन्वयक खुशाल शेेंडे यांनी केली आहे.





