26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ गृहमंत्र्याच्या पालक जिल्ह्यात मोजक्याच होमगार्डंना संधी,इतरावंर केला अन्याय

गृहमंत्र्याच्या पालक जिल्ह्यात मोजक्याच होमगार्डंना संधी,इतरावंर केला अन्याय

कार्यालय सोडून समादेशकर करोना काळात बेपत्ता; जिल्हाधिकारीसह जिल्हा पोलीस अधिक्षकांचेही दुर्लक्ष

0
863

गोंदिया,दि.१९ः-मार्च महिन्यापासून राज्यात करोना संसर्गांचा प्रादुर्भाव झाल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्या संचारबंदीमध्ये बंदोबस्तासाठी सुरवातीचे दोन महिने तर होमगार्डंना संधीच देण्यात आली नाही.जेव्हा की संचारबंदी काळात पोलिसांवर अधिक ताण असतांनाही त्यांना डावलण्यात आले.मात्र २२ मे पासून या होमगार्डंना जिल्ह्यात बंदोबस्तासाठी देण्यात आली ती ४० दिवसासाठी म्हणजे ३० जूनपर्यंत.परंतु राज्याचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांच्या पालक जिल्ह्यातच होमगार्ड समादेशक करोनामध्ये बेपत्ता असून होमगार्डंना न्याय मिळवून देण्याएैवजी त्यांची तक्रार व त्यांचे मनोबल खचविणाèया कामातच अग्रसर राहिल्याचे चित्र आजपर्यंत बघावयास मिळाले आहे.त्यातच जिल्ह्यात अंदाजे ६८५ महिला पुरुष होमगार्ड असून यापैकी फक्त २०० होमगार्डसंना संधी देण्यात आली आहे,त्यामुळे ४८५ होमगार्डचे काय अशा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.मुंबई सारख्या शहरात वयाची ५३ वर्ष झालेल्या होमगार्डसंनाही संधी देण्यात येते तर गोंदिया जिल्ह्यात मात्र ४०-४५ वयातील होमगार्डसना संधी देण्यात येत असल्याची तक्रारही काही होमगार्डसनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करुन सर्वांना आळीपाळीने बंदोबस्तासाठी संधी दिल्यास सर्वांनाच रोजगाराची संधी मिळेल अशी भूमिका आहे.मात्र करोना काळात आपल्याशिवाय दुसरे कुणीच चांगले प्रशासकीय काम केले नसल्याचा कांगावा करणाèया जिल्हा प्रशासनाला मात्र जिल्ह्यातील ४८५ होमगार्डसंना आपण न्याय देऊ शकलो नाही याची कुठेच चिंता नाही.होमगार्डचे समादेशक गावंडे यांचा तर कुठेच पत्ता नसल्याने अशा अधिकाèयावर तत्काळ प्रभावाने कारवाई करुन निलबिंत करावयास हवे ज्यांनी आपल्या अधिनस्त जवानांची काळजी घेण्याएैवजी कार्यालय बंद करुन मी गोंदियातच धन्यता मानली.गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांच्या पालक जिल्ह्यात तरी या होमगार्डसंना न्याय मिळेल कामाची संधी मिळेल अशी जी अपेक्षा होती,ती नेहमीप्रमाणेच काही चमचेगीरी करणाèयामुळे हातातून गेली आहे.आपले पोटं भरलं इतरांच नाही भरले तरी चालेल या वृत्तीचे काही होमगार्डस गोंदिया जिल्ह्यात असल्यानेच समादेश गावंडेसारख्यांचे फावत असल्याचेही बोलले जात आहे.