UGCने जाहीर केली देशातील 21 बोगस विद्यापीठांची नावे

0
12

कोयंबत्तूर,दि. १ – विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युनिव्हर्सिटी ग्रांट कमीशनने (UGC) आज (बुधवार) देशातील 21 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. युजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील सर्व विद्यापीठांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले नसल्याचे युजीसीने म्हटले आहे.

सर्वाधिक बोगस विद्यापीठे उत्तर प्रदेशात
देशात सर्वाधिक बोगस विद्यापीठे ही उत्तर प्रदेशात आहेत. उत्तर प्रदेशात एकूण 8 विद्यापीठे बोगस असल्याचे युजीसीने म्हटले आहे. दिल्लीत सहा तर तमिळनाडु, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येप प्रत्येकी एक-एक बोगस विद्यापीठ असल्याचा खुलासा युजीसीने जाहीर केलेल्या यादीतून झाला आहे.

काय आहेत नियम…
युजीसी अॅक्ट 1956 च्या सेक्शन 3 नुसार, केंद्र, राज्य, प्रोव्हिन्शियल अॅक्ट किंवा डीम्ड इनिस्टट्युटची मान्यता असलेली विद्यापीठे प्रमाणित आहेत. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन या विद्यापीठांना करणे बंधनकारक असते. याशिवाय देशातील ज्या संस्था स्वत:ला एक विद्यापीठ म्हणून मिरवतात, ते सर्व बोगस विद्यापीठे आहेत.
देशातील बोगस विद्यापीठांची यादी…
उत्तर प्रदेश-
महिला ग्राम विद्यापीठ (अलाहाबाद)
गांधी हिंदी विद्यापीठ (अलाहाबाद)
नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्पलेक्स होम्योपॅथी (कानपूर)
नेताजी सुभाषचंद्र बोस यूनिव्हर्सिटी (अलिगड)
उत्तर प्रदेश विश्वविद्यालय (कोसीकला)
महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यालय (प्रतापगड)
इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद (नोएडा फेस-2)
गुरुकुल विश्वविद्यालय (वृंदावन)

दिल्ली-
वाराणसेय संस्कृत विश्वविद्यालय (जगतपुरी)
कमर्शियल यूनिव्हर्सिटी लिमिटेड
यूनाइटेड नेशन्स यूनिव्हर्सिटी
व्होकेशनल यूनिव्हर्सिटी
एडीआर-सेंट्रल ज्यूडिशियल यूनिव्हर्सिटी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग

बिहार- मैथिली यूनिव्हर्सिटी (दरभंगा)

कर्नाटक- बाडागानवी सरकार वर्ल्ड ओपन एज्युकेशनल सोसायटी (बेलगाम)

केरळ- सेंट जोन्स यूनिव्हर्सिटी (कृष्णाट्टम)

मध्यप्रदेश- केशरवानी विद्यापीठ (जबलपुर)

महाराष्ट्र- राजा अरेबिक यूनिव्हर्सिटी (नागपुर)

तमिळनाडु- डी.डी.बी संस्कृत विश्वविद्यालय (त्रिची)

पश्चिम बंगाल- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन (कोलकाता)

भारतीय शिक्षा परिषदचे (लखनौ) प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.