24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक जगत महाविद्यालयात भूगोल विभागामार्फत राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन

जगत महाविद्यालयात भूगोल विभागामार्फत राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन

0
107

गोरेगाव,दि.20- स्थानिक जगत कला,वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे कोवीड 19 च्या काळात शैक्षणिक चर्चा घडवून शैक्षणिक स्तर उंचवण्यासाठी भूगोल विभागामार्फत बहुजन हिताय जगत शिक्षण सस्थेचे अध्यक्ष जगतरामजी रहांगडाले व सचिव नारायणरावजी येळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ .एन.वाय.लंजे यांच्या अध्यक्षतेखाली हवामान बदलाचे मानवी जीवनावर परीणाम या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते .या वेबीनारचे बिजभाषक सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील पर्यावरण विभागाचे प्रमुख डाॅ.प्रवीण सप्तर्षि तर प्रमुख वक्ता म्हणून वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय नागपूर येथील भूगोल विभागप्रमुख डाॅ .साधना देशपांडे व सहाय्यक प्रा .डाॅ .अविनाश तलमले यांनी मौलिक मार्गदर्शन केले .सदर वेबीनारमध्ये मोठ्या संख्येने झूमव्दारे प्राध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक, श्रोते सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ .एन .वाय .लंजे यांनी स्वागतपर भाषण केले तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एन.वाय.लंजे ,उपप्राचार्य डाॅ.एस .एच .भैरम,भूगोल विभागप्रमुख डाॅ.एम.के.देशपांडे,डाॅ.व्ही.आय .राणे, डाॅ.कु .एल.वाय.ढवळे,डाॅ .आर .एन .साखरे, प्रा.जे .आर .कटरे ,सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.या वेबीनारचे संचालन डाॅ.व्ही .आय .राणे तर आभार डाॅ .एम.के .देशपांडे यांनी मानले .