मोटारसायकल चोरांना मध्यप्रदेशातील बालाघाट येथून अटक

0
23

गोंदिया,दि.15ः- रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या टिबीटोली परिसरातून दतोरा येथील कृष्णा यादवराव गायधने यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटर सायकल क्रमांक-MH-35/AB-0993 किंमत-30000 रुपयाची 29 जानेवारीला सायंकाळी 6:00 वा.ते 6:30 वाजे दरम्यान अज्ञात चोराने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करीत मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, वारासिवनी,कटंगी येथे तपासी पथक रवाना करून गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे गुन्ह्यात चोरी गेलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटर सायकल क्रमांक- MH-35/AB-0993 चोरी संबंधाने गोपेन्द्र ढालसिंग बघेल रा.वार्ड क्रमांक.3 कटंगी यास गुन्ह्यात अटक करून विचारपूस केली.दरम्यान आरोपी गोपेंद्र बघेल यांने दीपकनाथ रमेशनाथ परिहार रा.चिमणाखारी तालुका बरघाट जिल्हा शिवनी (म.प्र.) यांचे कडून मोटरसायकलचा सौदा करून खरेदी केल्याचे काही रक्कम शिल्लक असल्याने व ती रक्कम  काही दिवसात देऊन मोटरसायकल आणणार असल्याची माहिती दिली.सौद्याची रक्कम जमविणे आरोपो क्रमांक 1यास शक्य झाले नसल्यामुळे त्यांनी ते वाहन ओ.एल.एक्स मोबाईल ॲपचे माध्यमाने विक्री करीता जाहिरात दिली असल्यामुळे नमूद आरोपी क्रमांक 1 चा शोध घेऊन त्याचे मार्फत आरोपी क्रमांक 2 यास सापळा रचून त्याचे ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेली नमूद मोटरसायकल ही जप्त करण्यात आली‌.दोन्ही आरोपी यांना अटक करण्यात आले.सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनात सपोनि.राजू बस्तवाडे,राजेश भुरे,सुनीलसिंह चौव्हाण,बाळकृष्ण राऊत, कपिल नागपुरे,आशिष अग्निहोत्री,दीक्षित दमाहे यांनी केली आहे.