अधिका-यांच्या नावे बनावट तक्रारी करणारा `तो` कोण?

0
15

गोंदिया- गेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेतील लपाचे कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट सहीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची तक्रार आयुक्तांकडे केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच धर्तीवर आता मुकाअच्या सहीने त्या कार्यकारी अभियंत्यावर कडक कारवाई करण्यासंबंधाने पत्र प्रधान सचिवाच्या नावाने टाकण्यात आले. या घटनांमुळे जिल्हापरिषदेत कार्यरत अधिकारी-कर्मचा-यांचे मनोधैर्य खच्चीकरण केले जात आहे.
जिल्हा परिषदेत पुन्हा लेटरबॉम्ब
परिणामी, अशा बनावट सहीने खोट्या तक्रारी करणाèया व्यक्तीचा शोध घेण्याची कार्यवाही कधी होणार, असा सवाल जिल्हा परिषद वर्तुळात चर्चिला जात आहे.सदर प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाची मात्र बदनामी होत असल्याने त्या व्यक्तीचा शोध अनिवार्य झालेला आहे.
गोंदिया जिल्हा परिषद ही तशी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत राहते. गेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागातील कार्यकारी अधिकारी उ.ना. वाकोडीकर यांच्या बनावट सहीने मुख्य कार्यकारी अधिकारी डी डी शिंदे यांची तक्रार करणारे पत्र विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले होते. त्या पत्रानुसार, मुकाअनी पंचायत राज कमिटीच्या आदरातिथ्याच्या नावावर अवैध वसुली करण्यासाठी वाकोडीकरांवर दबाव आणल्याचा उल्लेख होता. हे पत्र गेल्या १८ ऑगस्ट रोजी आयुक्तांना पाठविण्यात आले होते.
सदर पत्र हे वाकोडीकर यांनी पाठविले नसल्याचा खुलासा करीत त्यांच्या सहीची हुबेहूब नक्कल केल्याचे म्हटले होते. आता गेल्या १५ नोव्हेंबर तारखेची नोंद असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे पत्र प्रधान सचिव मा. मालिनी शंकर, जलसंपदा विभाग यांचेकडे पाठविण्यात आले आहे. या पत्रातील मजकूराप्रमाणे, वाकोडीकर हे स्थानिक आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या प्रभावाचा वापर करून अधिकाèयांवर दबाव आणत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या लोकप्रतिनिधीच्या प्रभावाचा वापर करून श्री. वाकोडीकर हे भ्रष्टाचार करीत असल्याचा उल्लेख करीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुकाअच्या नावाने सही करून पत्र प्रधानसचिवाच्या नावाने प्रेषित करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांकडे बघितल्यास जिल्हा परिषदेतील कार्यरत एखादा अधिकारी वा कर्मचारी विकृत मानसिकतेतून सदर कृत्य करीत असल्याचा संशय जि.प. वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
अशा बनावट सहीने अधिका-यांची तक्रार करण्याचा प्रकार qनदनीय आहे. यामुळे संबंधित अधिका-यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन अधिकारी -अधिका-यांत वा कर्मचाèयांत गैरसमज वाढीस लागण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या विकासावर पडत असल्याचे निदर्शनात येत आहे.
यामुळे असे बनावट प्रकार थांबविण्यासाठी त्या ‘कळलाव्या नारदाङ्कचा शोध घेण्याची मागणी आता समोर येत आहे. यावर जिल्हा परिषदेतील प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तक्रार करावी लागणार-सीईओ
सदर प्रकारचे पत्र मिळाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी.शिंदे यांना देण्यात आली.तसेच या पत्रानंतर कुणीतरी जिल्हा परिषदेतीलच कार्यरत कर्मचारी व अधिकारी खोटे पत्र पाठवून वरिष्ठाना मानसिक त्रास देत असल्याचे समोर आले आहे. सततच्या अशा प्रकारामळे सीईओ शिंदे यांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करणे गरजेचे झाले असल्याचे सांगत संबधिताचा शोध घेण्यासाठी ज्यांना कुणाला माहिती असेल त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.