विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या बलिदानातून प्रेरणा घ्यावी

0
12

गोंदिया : अमर शहीद विरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी स्मारक समिती गोंदिया, कॅरियर गाईड्स समिती सालेकसा, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या १५८ व्या बलिदान दिनाचे कार्यक्रम अवंतीबाई लोधी चौक रिंग रोड गोंदिया येथे पार पडले.
बलिदान दिनाचे औचित्य साधून अभियंता राजीव ठकरेले यांच्या संकल्पनेतून स्वच्छ गोंदिया स्वस्थ समाज कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद््घाटन रामटेकचे उद्योगपती ददुराम सव्वालाखे यांनी केले. अध्यक्षस्थानी सामाजिक विशेषज्ञ लीलाधर सुलाखे, अतिथी म्हणून सरपंच रामकिशोर रणगिरे, हिंगणाचे नगरसेवक नरेंद्र बेहरे, माजी विधायक भेरसिंह नागपुरे, भागवत नागपुरे, पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, जि.प. सदस्य कमलेश्‍वरी लिल्हारे, जि.प. सदस्य कुंदन कटारे, पं.स. सदस्य योगराज उपराडे, माजी पं.स. सदस्य रुपचंद ठकरेले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या मूर्तीचे पूजन करुन माल्यार्पण करुन करण्यात आले.
कार्यक्रमात वृक्षरोपण, रक्तदान, मोफत आरोग्य तपासणी, अमर शहीद विरांगणा, महाराणी अवंतीबाई लोधी यांचे विरतेवर संबोधन व एक शाम शहिदों के नाम, कवि संमेलन घेण्यात आले. यावेळी अतिथी म्हणाले, की विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या बलीदानातून प्रेरणा घ्यावी आणि सर्व स्वजातीय लोकांनी एकत्र यावे आणि लोधी समाजाला केंद्राचे यादी मध्ये समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले. यावेळी राजेश नागपुरे, बाबा अटराहे, कवित्री कल्याणी डहारे व दिलीप लिल्हारे यांचा सत्कार स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.