२८ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ कोहळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

0
15

अर्जुनी मोरगाव : विवाह सोहळ्य़ांवर वेळ व पैसा खर्च करण्यापेक्षा सामूहिक विवाह सोहळ्य़ांत आपल्या अपत्यांचे लग्न लावले पाहिजे. यासाठी सामूहिक विवाह सोहळ्य़ांचे आयोजन गरजेचे झाले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. कोहळी समाज सेवा मंडळाच्यावतीने रविवारी (येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात आयोजित कोहळी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्य़ात ते बोलत होते.मागील २३ वर्षांपासून आपली परंपरा जपत आलेल्या या कोहळी समाज सामुहिक विवाह सोहळय़ात यंदा २८ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले. या सोहळय़ात परिणयबद्ध झालेल्या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी सुमारे २0 हजार लोकांनी हजेरी लावली होती.
या नवदाम्पत्यांना आशिर्वाद देण्यासाठी खासदार नाना पटोले, माजी आमदार दयाराम कापगते, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, साकोलीचे आमदार बाळा काशिवार, अर्जुनी मोर कोहळी समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव कापगते, माजी सभापती प्रकाश गहाणे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, कोहळी समाज मंडळाचे अध्यक्ष उमाशंकर पर्वते, केवळराम पुस्तोडे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, उमाकांत ढेंगे, दादा फुंडे, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, बाजार समिती सभापती काशीफ जमा कुरैशी, भोजराम लोगडे, रघुनाथ लांजेवार, जिवन लंजे, होमराज ठाकरे, मुरलीधर ठाकरे, गजानन डोंगरवार, प्रमोद लांजेवार, लायकराम भेंडारकर, कुंदा गजानन डोंगरवार, तेजुकला गहाणे, शारदा नाकाडे, अंजनाबाई खुणे, घनश्याम हातझाडे, हेमराज पुस्तोडे, नाजुक कुंभरे, अँड. ज्ञानदेव परशुरामकर, लुनकरण चितंलगे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मांडत डॉ.गजानन डोंगरवार यांनी कोहळी समाज विवाह सोहळय़ाची सुरुवात श्यामराव बापू कापगते यांनी १९८१ पासून केलेली आहे. आजपर्यंत या कोहळी सोहळ्य़ात २लाख जोडपी विवाहबद्ध झालेली असल्याचे सांगीतले.