आदर्श ग्राम पाथरीत मोफत इंटरनेट

0
12

गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आदर्श ग्राम म्हणून निवड केलेल्या पाथरी (ता.गोरेगाव) येथे विविध विकास कामांचा धडाका सुरू आहे. त्याअंतर्गत ग्रामवासीयांना विविध सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.
गावातील नागरिक आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज व्हावेत आणि त्यांना मोबाईलद्वारे मोफत इंटरनेट सुविधेचा वापर करता यावा यासाठी वाय-फाय सुविधा प्रदान करण्याकरिता खासदार पटेल यांनी प्रस्ताव दिला होता. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी ७.५0 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या सेवेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून भारत संचार निगम लि. भंडार्‍याला निधी देण्यात आला. त्यामुळे लवकरच या गावात इंटरनेट वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रकारे नक्षलग्रस्त विशेष कृती कार्यक्रमांतर्गत पाथरी बस स्थानक ते दुर्गामंदिरपर्यंत सिमेंट रस्त्याच्या प्रस्तावित कामाला मंजुरी प्रदान करण्यात आली. ५लाख रुपयातून हा रस्ता निर्माण केला जाणार आहे.