आरोग्य कर्मचारी आमरण उपोषणावर

0
8

गडचिरोली : आरोग्य कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आमरण उपोषण आंदोलनाला सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरूवात करण्यात आली आहे. आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक यांचे रिक्त पदे पदोन्नतीने भरावी, कर्मचार्‍यांना नियमित व स्थायी करावे, पात्र आरोग्य कर्मचार्‍यांना कालबध्द, आश्‍वासीत प्रगती योजना लागू करावी, हॉर्डशीप अलाऊंस थेट जिल्हास्तरावरून कर्मचार्‍यांच्या खात्यामध्ये जमा करावे, कुटुंब कल्याण केसेसची व्यक्तीगत उद्दीष्ट्ये न देता उपकेंद्रनिहाय उद्दीष्ट देण्यात यावे आदी मागण्यांसाठी आरोग्य कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, महिला अध्यक्ष निलू वानखेडे, कार्याध्यक्ष आशानंद सहारे, कोषाध्यक्ष अनिल मंगर, सचिव विनोद सोनकुसरे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते