प्रगणकांना झाले व्याघ्रदर्शन

0
20

चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये बुद्ध पौर्णिमेला शनिवारी रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या दरम्यान, अनेक प्रगणकांना वाघासह बिबट व अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन घडले. यावर्षी ताडोबाच्या बफर झोन क्षेत्रात ११८ तर कोअर झोन क्षेत्रात ८२ मचानी उभारण्यात आल्या होत्या. शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या दुधाळ प्रकाशात शेकडो वन्यजीव प्रेमींनी प्रगणना केली. त्यात वाघ,अस्वल, हरिण, बिबट यासह विविध प्राण्यांचे प्रगणकांना दर्शन झाले.