पवार समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली  मुख्यमंत्र्यांची भेट

0
10

 नागपूर दि. 23 –रामगिरी शासकीय निवासस्थानी नागपूर शहरातील पवार समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली. यावेळी पवार
चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मोतीलाल चौधरी, नामदेव राऊत, पृथ्वीराज रहांगडाले, मधुकर चोपडे, अनिल डोंगरदिवे, संजय फरकाडे, चुन्नीलाल पटेल, पन्ना चौधरी , रमेश ठोंबरे उपस्थित होते.
            यावेळी मोतीलाल चौधरी यांना मुख्यमंत्री महोदयांकडे पवार समाजाच्या अडचणी मांडतांना सांगीतले की, शहरात 4 ते 5 लाख लोकसंख्या पवार समाजाची असून या समाजासाठी समाज भवन, वाचनालय तसेच  समाजातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्याच बरोबर पवार समाजाचे चक्रवर्ती राजाभोज यांची पुतळा बसविण्यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी कुठेही जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी पवार समाजाच्या अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु असे सांगितले.