पालकमंत्र्यांची हाजराफॉल पर्यटनस्थळाला भेट

0
12

गोंदिया,दि.१६ : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि ग्रीन व्हॅली म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील दुर्गम व नक्षल भागातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या हाजराफॉलला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी १५ ऑगस्ट रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय पुराम, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी यावेळी मोठ्या संख्येने असलेली पर्यटकांची गर्दी पाहून आनंद व्यक्त केला. तसेच येथे साहसी खेळाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी असलेल्या बर्मा ब्रीज, कमांडो नेट, व्ही शेप ब्रीज, मल्टीवाईन ब्रीज, हाय रोप कोर्स एक्टीव्हिटीज झीप लाईन, झार्मींग बॉल, रोप-वे आदी सुविधांची पाहणी केली.यावेळी त्यांनी काही आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला. नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी तसेच यामधून ज्यांना रोजगार मिळाला आहे त्या युवक-युवतींशी चर्चा देखील केली.
मागील वर्षी पालकमंत्री बडोले यांनी भेट दिली असता पर्यटकांची गर्दी कमी होती. तसेच साहसी खेळाच्या सुविधासुध्दा तेथे उपलब्ध नव्हत्या. आज हाजराफॉल येथे साहसी खेळाच्या निमित्ताने असलेल्या सुविधा व तेथील परिसराचा झालेला विकास बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.