दसरा ‘र्मयादा दिवस’ म्हणून घोषित करा

0
10

गोंदिया,दि. १८  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींच्या सिद्धांतांवर अंमलबजावणी व्हावी यासाठी ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ हे राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे. जागतीक स्तरावर योगा दिवस सुरू करून स्वस्थ भारताच्या संकल्पनेला नवी उर्जा प्रदान केली आहे. त्याचप्रकारे, दसरा हा दिवस रावण दहन ज्या ऐवजी ‘र्मयादा दिवस’ रूपात घोषित करावा, असे आवाहन संत बांगळूबाबा यांनी केले.
श्री सद्गुरूनाथ संस्कार सिंचन मंडळाच्यावतीने ग्राम ढाकणी येथे आयोजीत र्मयादा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. र्मयादा दिवस कार्यक्रमाचे उद््घाटन साहीत्यकार धनराज उके यांच्या हस्ते दिलीप डोये यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. पुढे बोलताना बांगळूबाबा यांनी, आज सर्वांच्या रक्तात रावणाचे गुण आले असून आम्ही विजयादशमीचा दिवस रावण दहन एक उत्सव स्वरूपात साजरा करतो. यात मात्र र्मयादा पुरूषोत्तम रामचंद्रांचे आदर्श व विचारधारांना विसरत चाललो आहोत. रामप्रभूंनी ज्याप्रकारे आपले सर्व संबंध सांभाळले व त्यांच्या या गुणांना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी विजयादशमीला रावणदहन म्हणून साजरा न करता र्मयादा दिवस घोषीत करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. याप्रसंगी उद्घाटक उके यांनी, आज मोबाईल-इंटरनेटच्या स्वच्छंद वापराने
वाईट गोष्टी बळावल्या असून त्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. विशेष म्हणजे युवा वर्ग यांचे शिकार होऊन चुकीच्या गोष्टींना निमंत्रण देत आहेत. परिणामी समाजात व्यभीचार, अराजकता व लालसा वाढत चालली आहे. त्यामुळे आम्हाला रामायण सारख्या पौराणिक ग्रंथांतून रामचंद्रांचे चरित्र जागृत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्तावीक जगदीश येडे यांनी मांडले. आभार मंडळाचे सचिव वझीर बिसेन यांनी मानले. विशेष म्हणजे र्मयादा दिनानिमित्त ह्दयरोग, मधूमेह व रक्तदाब नि:शुल्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महामृत्यूंजय यज्ञाचे समापन करून गोपालकाला व महाप्रसाद वितरीत करण्यात आला.