‘ती’मुलगी खर्‍या मातापित्याचीच निघाली

0
15

गोंदिया,दि.28- जिल्ह्यातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय मागील पंधरवड्यात घडलेल्या एका घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली होती. रुग्णालयात प्रसूतीकरिता आलेल्या एका महिलेने प्रसूतीदरम्यान मुलगा झाल्या असल्याची बतावणी करीत रुग्णालय प्रशासनाने मुलाऐवजी मुलगी झाली असल्याचे सांगितले होते.
मात्र हे प्रकरण अखेर पोलिसठाण्यात गेले व त्या मुलीची चाचणी डीएनएच्या माध्यमातून करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. आज डीएनए चाचणीचा आवाहल प्राप्त झाला असून ती नवजात मुलगी त्याच मातापित्याची असल्याचे स्पष्ट झाले असून रुग्णालय प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ सालेकसा तालुक्याच्या बिंझली गावातील पुष्पा लिल्हारे या महिलेला १२ डिसेंबरलाला गोंदियाच्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय प्रसूती करीत दुपारी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, डॉक्टरांनी पुष्पा लिल्हारे या महिलेची तपासणी केल्यानंतर सामान्य प्रसूती होईल म्हणून संध्यकाळ पर्यंत थांबवून ठेवले होते. पुष्पाने रात्री ८ वाजेदरम्यान एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यापूर्वी अर्धा तासाच्या आत रुग्णालय इतर दोन महिलांनीही मुलींना जन्म दिला.
यादरम्यान, रुग्णालयातील (मावशी) परिचारिका वनिता मेहर यांनी नातेवाईकांकडॅन प्रसूतीनंतर पैसे वसुलीसाठी लिल्हारे कुटुंबीयांना ५00 रुपयांची मागणी करत तुम्हाला मुलाला जन्माला आले असल्याची बतावणी केली होती. आंनदाच्या भरात लिल्हारे कुटुंबीयांनी रुग्णालयातील (मावशीला) परिचारिकेला ४00 रुपये दिले होते.
मात्र लिल्हारे कुटुंबीयांना झालेल्या बाळाची फाईल दिली असता त्यात मुलाऐवजी मुलीची नोंद केली असल्याचे लक्षात येताच लिल्हारे कुटंबीयांनी रुग्णालय गोंधळ घातला होता. जननी मातेला आणि जनवजात मुलीला थोड्याच अवधी नंतर शत्रक्रिया कक्षातून बाहेर आणल्या नंतर नवजात मुलगी ही शारीरिक दृष्ट्या कमकुवत असल्याने तिला रुग्णालयातील नवजात कक्षात ठेवण्यात आले होते. एकंदरीतच या परिचारिकेवर विश्‍वास करीत आपल्याच मुलीला ते या दरम्यान दूर सारत होते.
अखेर प्रकरण पोलिसात गेल्यानंतर लिल्हारे कुटुंबीय आणि नवजात मुलीच्या रक्ताचे नमुने डीएनए तपासणीकरिता नागपुरातील प्रयोगशाळेत पाठविलेले होते. आज या चाचणीचा आवहल प्रशासनाला प्राप्त झाला असून आलेल्या अहवालावरून नवजात मुलगी ही लिल्हारे कुटुंबीयांचीच असल्याचे उघडकीस आले आहे. तर आलेल्या अहवालावर समाधान व्यक्त करत मुलीला पूर्णत: स्वीकारले असल्याची माहिती नवजात मुलीच्या पालकांनी दिली आहे.
शिवाय हे सर्व प्रकरण परिचारिकेचा सांगण्यावरून घडले असल्याचे देखील स्पष्ट झाले असून तिच्यावर सुद्धा तिचे देखील स्थानांतर दुसर्‍या ठिकाणी करण्यात आले आहे. तर सादर प्रकरणात परिचारिकेने रुग्नाकडून पैसे उकळण्याकरिता तिला मुलगा झाला असे सांगितल्या नंतर हा सर्व खटाटोप झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीत या प्रकारात वरिष्ठांचे देखील दुर्लक्ष होत असल्याने निष्पन्न झाले असून त्याचा भुर्दंड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो हे समोर आले. मात्र असे असले तरी आजही ग्रामीण भागात मुलगा तसेच मुलगी झाल्यानंतर पालकांचा व्यवहारात कसा बदलावं पाहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण याला म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे मुलगा तसेच मुलगी यातील असमानता आज शहरी भागात जरी कमी झाली असली तरी ग्रामीण भागात अजूनही या संदर्भात उदासीनताच दिसून येत आहे.