विद्युत सुरक्षिततेचे पालन,वाचवी मानवी जीवन…!

0
14

गोंदिया:- महावितरण गोंदिया परिमंडळ व विद्युत निरिक्षक कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त़रित्या गोंदिया परिमंडळात ११ ते १७ जानेवारी २०१७ निमित्त़ विद्युत सप्ताह दरम्यान परिमंडळ स्तरावर जनजागृती मोहिम सुरू करण्यात येत आहे. संपुर्ण महाराष्र्र्टांंसह गोंदिया परिमंडळातील गोंदिया व भंडारा येथे मोठया प्रमाणात जनजागृती होणार असुन यामध्ये जनसामान्य़ लोकांपासुन विद्यार्थी मित्रांपर्यंत जनजागरण करण्यात येईल.
मानवी जीवन हे अमुल्य देणगी आहे, त्यामुळे त्याची सुरक्षा ही अतिशय महत्वाची बाब ठरते. आजच्या आधुनिक जीवनात जेथे प्रत्येक कामासाठी यंत्र व तत्सम साधनांची उपलब्धता झाली आहे. तेथे या यंत्रांच्या असुरक्षित वापरामुळे जीव धोक्यात येण्याच्या घटनाही घडत आहेत. अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजाप्रमाणेच वीजही आज महत्वाची गरज बनली आहे. परंतु वीज ही डोळयांनी दिसत नसली तरी तिचा परिणाम मात्र जाणवतो व तो केव्हा केव्हा घातकही ठरतो. सुरक्षितता हाच एक मुलमंत्र वीजेपासून सुरक्षेसाठी उपयोगात येतो.
हा सप्ताह आठवडाभर जनेतेचे प्रबोधन होण्यासाठी राबविण्यात येत असला तरी वीज सुरक्षेबद्दल काही महत्वाच्या बाबी जनतेसाठी सुरक्षेची गुरूकिल्ली ठरणार आहेत. त्यानी या गुरूकिल्लीचा वापर करून स्वतःची, स्वतःच्या कुटूंबियांची इतरांचीही मदत करावी व सुरक्षिततेचा मंत्र घराघरात पाहोचवावा. महावितरणद्वारे विविध शाळा, कॉलेजेस मधून कार्यशाळा घेवून तसेच पथनाटय व रॅली आदी, माध्यमातून वीजसुरक्षेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.
ग्राहकांनी वीजसुरक्षेचे टिप्स़ पाळल्या तर नक्कीच त्यांचा वीजेच्या धोक्यापासून बचाव होवू शकतो. या छोटया टिप्स मानवी जीवन वाचविण्याचे मोठे काम करू शकतात.

१. अनेकदा वीजवाहिणीच्या खाली अतिक्रमण होते. घराचे बांधकाम करण्यात येते. घरावर छत म्हणून टिनाचे पत्रे वापरण्यात येते तसेच आकडा टाकून वापरण्यात येते व प्रसंगी अपघात होतो.
२. पतंगीच्या नादात वीजेचा धक्का लागून प्राणहाणी झाल्याची अनेक उदाहरणे सापडतील. पतंग सवाधानीपूर्व उडवावी व वीजेच्या तारात अडकल्यास ती काढू नये.
३. वीजपुरवठा खंडीत झाला की, काही अनधिकृत व्यक्ति वीजदुरूस्ती स्वतःच वीजेच्या खांबावर चढून कुठल्याही सुरक्षा साधनाशिवाय करू पाहतात. ते अतिशय धोक्याचे तसेच अनधिकृत आहे.
४. अपघात टाळण्याकरिता सर्वांचेच मनापासून सहकार्य गरजेचे असते.पात्र,शारीरिकदृष्ट्या सक्षम वा विचारपूर्वक काम करणारा कर्मचारीच अपघात टाळू शकतो. असुरक्षितपणे काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा कोणत्याही संस्थेवर बोजा स्वरूप असतो. तो स्वतःला, सहका-याना तसेच जनतेला धोकाधायक असतोच.
५. पावसाळयाच्या दिवसात मीटरमध्ये पाणी जावून वीजप्रवाह भिंतीत येणे शक्य असते अशा वेळी वीजेचे मीटर
पाणी लागणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्य़क असते.
६. घरांची अर्थिंग व्यवस्थित असणे आवश्य़क असते ती वेळोवेळी तपासून नियमाप्रमाणे व्यवस्थित करून घेण्यात यावी.
७.विदयुत उपकरणे ओल्या हातांनी हाताळणे टाळावे.
८. वीजवाहिणीच्या खाली किंवा जवळ बांधकाम करू नये
९ अर्थिंगचीच थ्रीपीन वापरावी तसेच एका सॉकेटमध्ये अनेक पीन घालू नये.
१० घरातील वायरींगचे काम परवाणाधारक कंत्राटदाराकडुनच करून घेण्यात यावे.
११.वीजेचे वायर हे आयएसआय प्रमाणित असावे
१२.अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी एमसीबी(मिनिएचर सर्किट ब्रेकर) किंवा
एमसीसीबी (मोल्डेड केस सर्किट ब्रेकर ) किंवा एलसीबी वापरावे ( अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) व ते पण
आय. एस. आय. प्रमाणितच असावे.
१३.विदयुत खांब किंवा तनास गुरेढारे बांधू नका.
१४. शेतातील कुंपनात विदयुतप्रवाह सोडू नका. न्युट्रलकरीता उघडया तारांचा वापर न करता इंसुलेटेड तारांचा
वापर करावा.
१५.वीजेचा अनधिकृत वापर करू नये.
१६. विदयुत उपकरणे दुरूस्तीच्या वेळी, वीजपुरवठा बंद केल्याची खात्री करूनच वीजेचे प्लग काढावे.
१७. कुलरमध्ये पाणी भरतांना स्लीपर्स घालाव्या व वीजेचा प्लग काढल्याची खात्री करावी.
१८.वीजतारांखाली कापलेले पीक ठेवू नये.
१९.कपडे वाळविण्यासाठीची तार, वीजतारांच्या संपर्कात नसल्याची खात्री करून घ्यावी.
२०. वीजेच्या खांबांपासून दूर राहावे .
२१. तात्पुरत्या वायर्स लावू नये, योग्य पध्दतीने वायरींग करून घ्यावी.
२२. विजेच्या तारा तुटलेल्या आढल्यास महावितरणच्या टोल फ्रि क्रमांकावर १८००२३३३४३५ किंवा १८००२ ००३४३५ किंवा १९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नजिकच्या महावितरणच्या कार्यालयास सूचना दयावी.