रतनाराच्या विद्याथ्र्यांशी संवाद साधून सीईओ पुलकुंडवार भारावले

0
14

गोंदिया,berartimes.com दि.०५-गोंदिया पंचायत समितीअतंर्गत येणाèया वरिष्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील विद्याथ्र्यांशी मनमोकळेपणांने सवांद साधल्यानंतर विद्याथ्र्यांनी दिलेला प्रतिसाद बघून शाळेच्या भेटीवर गेलेले गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार चांगलेच भारावले.२ फेबुवारीला दुपारच्या सुमारास सीईओ पुलकुंडवार यांनी शाळेला भेट दिली.सोबतच ग्रामपंचायतीला भेट देऊन विकास कामाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे यांच्यासह काही नागरीकांनी ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांची तक्रार जिल्हा परिषदेकडे केली आहे,त्या अनुषगांने सुध्दा रतनारा भेट सीईओंची महत्वाची होती.सीईओनी शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी करीत मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक,अंगणवाडीच्या सेविका आणि गावातील नागरिकांशीही चर्चा केली.इयत्ता दुसरीच्या वर्गात जाऊन प्रत्येक विद्याथ्र्यांशी भेटून त्यांना शिक्षकांनी काय शिकवले याची माहिती घेतली.विद्याथ्र्यांनी प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सीईओना दिले.विद्याथ्र्यांकडून मिळालेले उत्तर बघून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणही चांगले असल्याचे त्यांना पाहणीत बघावयास मिळाले.विद्याथ्र्यांना शुभेच्छा देत भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बघा आणि यश मिळवा अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी सहायक गटविकास नरेश भेंडारकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान गावातील काही कामांची पाहणी केली,वास्तविक ग्रामसेवक कोल्हटकर यांनी विकास निधीमध्ये कुठल्याही प्रकारचा निधीचा अपहार होणार नाही याची काळजी घेतल्यानेच गावातील काही नेत्यांच्या पोटात दुखले आणि त्यांनी तक्रार केली.या गावात सर्वाधिक काळ ग्रामसेवक म्हणून काम कोल्हटकर यांनीच केले आहे.मंजुर निधीतच अधिक बांधकाम करुन काम केल्यानेच काहींच्या पोटात दुखल्याने त्यांची तक्रार झाल्याचे काहींचे म्हणने आहे.