26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home Featured News जिल्ह्यातील तीन तरुणींची केबीन क्रू परिक्षेत यशस्वी भरारी

जिल्ह्यातील तीन तरुणींची केबीन क्रू परिक्षेत यशस्वी भरारी

0
21

गोंदिया दि.८: एअर इंडियाच्या साऊथ रिझनकरिता घेण्यात आलेल्या केबीन क्रू परिक्षेत जिल्ह्यातील तीन तरुणींनी यशस्वी भरारी घेत परिक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावून जिल्ह्याचे नाव लौकीक केले आहे. यात गोंदियाची मयुरी प्यारेलाल धामडे, गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील रिना जियालाल कटरे व अर्जुनी-मोरगाव येथील मोहिनी सुधाकर मेश्राम यांचा समावेश आहे.पालकमंत्री मित्र परिवार व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मागील वर्षी २१ व २२ मे रोजी एअर इंडियाच्या केबीन कू्र व एअर होस्टेस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा येथील स्वागत लॉन मध्ये आयोजित करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींनी सहभागी होवून प्रशिक्षण घेतले होते. जिल्ह्यातील तरुण-तरुणींना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी ना. बडोले यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत क्षेत्रातील तज्ञांद्वारे दोन दिवस प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणींनी मोठे यश संपादन केले आहे.तिन्ही तरुणी वैद्यकीय चाचणी नंतर एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून रुजू होणार आहेत.