उच्चदाबाच्या विद्युत ताराच्या स्पर्शाने महिलेचा मृत्यु

0
6

गोंदिया,दि.२६-गोंदिया शहरातंर्गत येत असलेल्या साई कॉलनीतून जाणाèया विज वितरण विभागाच्या अतिउच्च दाबाच्या(हायटेंशन ३३हजार केव्ही)तारांना स्पर्शहोऊन बसलेल्या धक्याने महिलेचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी(दि.२६)८ वाजेच्या दरम्यान घडली.सदर मृत महिलेचे नाव रिता संजय मेश्राम(वय ३२) असे आहे.ही महिला आपल्या घराच्या स्लपवर धुतलेले कपडे वाडविण्याकरीता गेली असता.घरावरुन गेलेल्या विज वितरण कपंनीच्या या तारामध्ये अचानक झालेल्या स्पार्किंगच्या धक्का लागल्याने रिता मेश्राम यांचा मृत्यु झाला.त्यांच्यामागे पती व दोन लहान मुले आहेत.रामनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.या परिसरातून जाणारे ही उच्चदाबाचे तार खुप खालपर्यंत आल्याने पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत असल्याने विज वितरण कंपनीने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे यांनी केली आहे.सोबतच त्यांनी मृत महिलेच्या कुटुबियांचे सांत्वनही केले.यावेळी जि.प.सभापती छाया दसरे,नगरसेविका हेमलता फतेह(कटरे) या सुध्दा उपस्थित होत्या.