धामण सापांचे प्रणय ताडोबाच्या बफर क्षेत्रात

0
25

चिमूर,दि.25 -देश विदेशात प्रसिध्द असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जैव विविधतेने नटलेले आहे .पावसाळ्यास सुरवात झाल्याने विविध जातींचे साप बिळातून बाहेर आले आहेत.त्यातच पडसगाव वन परीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पिपर्डा बिटात कक्ष क्रमांक ५६१ मध्ये सकाळची नियमीत रपेट मारत असताना धामण जातीच्या सापाच्या युगलाचे प्रणय रंगल्याचे दिसले.हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने देशी विदेशी पर्यटकांचा इकडे ओढा वाढला आहे.  विविध जातीचे दुर्मीळ वृक्ष, किटक, फुलपाखरे, पक्षी, लहान मोठे प्राणी तसेच सापांच्या वेगवेगळ्या जाती निवास करतात. मोर आणि सापांचे पावसाळ्यात सर्वाधिक वावर असतो.याचे प्रत्यय प्रणयात मग्ण असलेल्या धामण युगलांना पाहण्या करीता गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. सापांचे दुर्मिळ असणारे व क्वचीत नजरेत पडणारे प्रणय पाहण्याची उत्सुकता यामुळे वाढलेल्या गोंगाटाने अखेर एक तासभर चाललेल्या प्रणयास विराम देऊन साप निघून गेले.नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याकरीता तसेच सापांना संरक्षण मिळावे , करीता पळसगाव वन परीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे, सहकारी वन संरक्षक उद्धव लोखंळे, वनक्षक सातपुते व साळवे यांनी नागरीकांना समजविण्याचे प्रयत्न केले.