गोरेगाव नगर पंचायत हागणदारीमुक्तीच्या वाटेवर

0
5

गोरेगावŸ,दि.११: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या शहरांची तपासणी राज्य स्तरीय समितीकडून करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गोरेगाव नगर पंचायतीची तपासणी समितीने केली. समितीतील सदस्यांनी चांबारबोडी, सोनार बोडी, आठवडी बाजार, पवन तलाव, रेल्वेलाईन, पोलीस ठाणे, दलित वस्ती, शाळा, कॉलेजची पाहणी केल तसेच घनकचरा व्यवस्थापन केंद्राची पाहणी केली.
वैयक्तीक शौचालय व सार्वजनिक शौचालयलयाची पाहणी केली. नागपूर विभागात गोरेगाव नगर पंचायतीचे उत्कृषट काम असल्याचे मत नागपूर महानगर पालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मांडले. यावेळी समिती सदस्य रqवद्र भेलावे, चेतन भैरम, पंकज देवकर यांनी नगर पंचायतीची पाहणी करुन स्तुती केली. समिती सदस्यांच्या हस्ते नगर पंचायतीच्या २५ सफाई कामगारांना रेनकोटचे वितरण करण्यात आले. तसेच या कर्मचाèयांचा दोन लाख रुपयाचा विमा काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी दिली. यावेळी नगरराध्यक्ष सीमा कटरे, उपाध्यक्ष आशिष बारेवार ायंच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
नगर पंचायतीच्यावतीने ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत १५०० वृक्ष प्रभाग निहाय लावण्याचे नियोजन करुन नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व नगरसेवकांनी वृक्ष qदडी काढून वृक्षारोपणाचे महत्व पटविले. या कार्यक्रमातच ४६ दिव्यांगाना दिव्यांग विकास निधीतून १२४८ रुपये निधीचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत ५ टक्के निधी खर्च करण्याची मुभा असल्याने ११ अंगणवाड्यांना ३ हजार रुपये किमतीचे आरो वॉटर फिल्टर वितरीत करण्यात आल्याची माहिती ही मुख्याधिकारी यांनी दिली. यावेळी पाणीपुरवठा सभापती रqवद्र चन्ने, महिला बाल कल्याण सभापती उषा रहांगडाले, नगरसेवक हिरणबाई झंझाङ, निमावती धपाडे, शमली जायस्वाल, सुेश रहांगडाले, रेवेंद्र बिसेन, मधुमाला साखरे, मलेश्याम येरोला, अरqवद जायस्वाल उपस्थित होते.