स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत अभियान – नवीन इतिहासाची निर्मिती

0
68

आधूनिक भारताच्या इतिहासात प्रथमच देशाचे मा. प्रधानमंत्री यांनी स्वच्छता, उघडयावरील हागणदारीपासून मुक्ती आणि वैयक्तीक स्वच्छता उपक्रमास राष्ट्रीय अभियानाचे स्वरूप दिले आहे. त्यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासियांना केलेले आव्हान असेल किंवा न्यूयॉर्क येथील टाइम्स स्केवअर येथून  केलेले संबोधन असेल,प्रधानमंत्री यांनी एका दुर्लक्षित विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. स्वच्छतेसारख्या विषयावर बोलणे जेथे अप्रिय आणि घृणास्पद समजले जात होते, अशा स्वच्छतेला मा. प्रधानमंत्री यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे देशस्तरावर प्रथम प्राधान्य देऊन, एक शाश्वत चळवळ निर्माण करण्यास मोठया प्रमाणात यश मिळवता येणे शक्य झाले आहे.महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्याने “स्वच्छता ही सेवा” या मिशनची सुरूवात दि. 15 सप्टेंबर 2017 ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधी साठी करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर सकारात्मक परीणाम होण्यासाठी या अभियानाच्या कालावधीत विविध आणि नाविण्यूपूर्ण अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या अभियानाच्या काळात वर्ग 1, 2 आणि 3 अधिका-यांना जिल्हयातील गावे दत्तक म्हणून देण्यात आली आहेत.तसेच त्यांना या काळात किमान 5 वेळा संबंधित गावास भेट देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान त्यांनी गावात नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, कामांचे पर्यवेक्षण आणि सुरक्षित आणि योग्य स्वच्छता सुविधांच्या अवलंब करण्यासाठी समुदायास प्रेरीत  करावयाचे आहे आणि प्रोत्साहन दयावयाचे आहे. सदर कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक भेटीदरम्यान सदर अधिका-यांनी गावात किमान 3 तास थांबणे अभिप्रेत आहे. शौचालय बांधकामास व एकंदरीत स्वच्छतेच्या कामास वेग देणे हा या उपक्रमा मागील मुख्य उददेश आहे.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) ची प्रभाविता वाढविण्याच्या दृष्टीने अभियानाच्या काळात प्रत्येक दिवशी विभिन्न उपक्रमांचा समोवश करण्यात आला आहे. दि. 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता महोत्सवातून संपूर्ण राज्यातील रोज नवे उद्दिष्ट साध्य होणार आहे. या अभियानाचे उदघाटन अहमदनगर जिल्हयातील हिवरे  बाजार या ग्रामपंचायती पासून करण्यात आले आहे. आदर्श गावाचे एक उदाहरण प्रस्थापित करून याप्रमाणाचे आपले गाव देशील आदर्शवत करण्यासाठी इतर गावांना प्ररेीत करणे हा यामागील उददेश आहे. हे मिशन गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागापासून ते मुंबई सारख्या मेगा सिटी पर्यंत समांतर पध्दतीने राबविले जाणार आहे. यामुळे राज्यस्तरावर स्वच्छतेबाबत मोठी सकारात्मक उर्जा मिळणार आहे.
या मिशन कालावधीत राज्यातील सर्व जिल्हयातून नियमित अहवाल प्राप्त केले जाणार असून, दररोज साध्य होणारे शौचालय बांधकाम, कमी खर्चाच्या भूमिगत गटार, उघडयावर शौचविधी ठिकाणांची झालेली स्वच्छता रथाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी स्वच्छतेची मोठी चलचित्र व माहितीपट प्रदर्शित करणे, तसेच पथनाटय, बैठका, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅली, सरकारी कार्यालयांची स्वच्छता अशा सर्व माध्यमातून, परस्पर संवाद आणि स्वच्छता जागृती कार्यक्रमांचे आयोजन
राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे राज्यातील स्वच्छता संबंधी मोठी प्रगती साधण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.
महाराष्ट्र हे नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून ओळखले गेले आहे व समाजातून आलेल्या चांगल्या सूचनांचा येथे स्वीकार करण्यात आला आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महाराष्ट्रात स्वच्छतेविषयी मोठया प्रमाणात योगदान दिले आहे. त्यांनी स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करताना वेगवेगळया स्तरावर वेगवेगेळे प्रयोग करून, जनमानसाच्या मानसिकतेवर घाला टाकून स्वच्छता रूजवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते आज हि प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात तिसरे, जनसंख्या, तसेच आदिवासी जनसंख्येत देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील वैविध्याचा विचार करता पर्यावरणीय, भौगोलिक विविधतेसोबतच,सांस्कृतिक, सामाजिक, विविध जाती, वैविध्यपूर्ण परिस्थिती आणि लोकांची विचारधारणा अशा सर्वच बाबी विचारात घेता राज्यात तशी असंख्य आव्हाने आहेत. मात्र प्रत्येक आव्हाने संधीच्या स्वरूपात राज्याने स्विकारलेली आहेत. अशी परिस्थिती असताना देखील महाराष्ट्र राज्य स्वच्छता कामात एक
मैलाचा दगड ठरला आहे.
स्वच्छ भारत अभियान हा केवळ शौचालय बांधकामाचा विषय नाही. भारताच्या इतिहासातील वर्तणूक बदलासाठी घेतलेला सर्वात मोठा पुढाकार आहे. एवढेच नव्हे देश हागणदारी मुक्त करण्यासाठी हाती घेतलेला हा सर्वात मोठा कार्यक्रम होता आणि अशा प्रकारे संपूर्ण जगभरात अशा प्रकारे कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली नाही. याचबरोबर शासनाने युनिसेफ मुंबई, टाटा ट्रस्ट,जागतिक बँक  इ. सारख्या विविध संस्थांच्या सहाय्याने माहिती शिक्षण संवादाच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली, आणि या उपक्रमांमुळे राज्यात स्वच्छता सुविधांच्या निर्मिती आणि शाश्वत वापरामध्ये एक मैलाचा दगड रोवण्यास मदत देखील झाली आहे.
सन 2012, मध्ये राज्यात स्वच्छतेची साध्य केवळ 45 टक्के होते तर सदयस्थितीत ती 87 टक्कयापर्यंत जावून पोहचली आहे. देशातील  107086 हागणदारी मुक्त ग्रामपंचायती पैकी 18460 ग्रामपंचायती हया महाराष्ट्र राज्यातील आहेत आणि ही आकडेवारी 17 टक्क्यापेक्षा जास्त आहे. सदस्थितीस 11 जिल्हे, 163 तालूके आणि 26943 महसूल गावे हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. माहिती शिक्षण संवाद उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सन 2016-17 या आर्थिक वर्षात राज्यात केवळ 7 लाख शौचालयाचे बांधकाम करण्यासाठीचा निधी उपलब्ध असताना साधारण 19 लाख शौचालयाचे बांधकाम करण्यात राज्यास यश प्राप्त झाले आहे. याचाच अर्थ आज राज्यात
लोकांना उघडयावरील हागणदारीचे दुष्परीणाम लक्षात आले असून या वाईट प्रथेतून मुक्त होण्यासाठी आज स्वत:हून पुढाकार घेत आहेत.
स्वच्छतेचा खरा प्रवास हा व्यक्ति पासून ते त्याचे घर, ते त्याचे अंगण ते त्याचे गाव आणि याचबरोबर राज्यात आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत असतो. सर्व शासकीय इमारती जसे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, शाळा आंगणवाडी कॉलेज, आणि खाजगी इमारती मध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण होणार नाही या बाबतची दखल घेतली पाहीजे. सार्वजनीक शौचालयाचे बांधकाम आणि त्याच्या शाश्वत वापरासाठी निर्माण झालेल्या या सुविधांच्या देखभाल दुरूसती संबंधी योग्य पाऊले उचलावी लागतील.
स्वच्छता आणि मानवी विकास संबंधीच्या समस्या यांच्यामध्ये एक परस्पर संबंध आहे. तोंडावाटे होणा-या संसर्गामुळे कुपोषण, त्वचा रेाग, महिलांची प्रतिष्ठा, किशोर वयीन मुलींच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणात मोठया प्रमाणा वाढ होणे तसेच बालमृत्यू  यासारख्या गंभीर स्वरूपाच्या परीणामांना केवळ अस्वच्छतेमुळे सामोरे जावे लागते.
राज्याची आणि परिणामी देशाची आर्थिक प्रगती मंदावण्यामध्ये स्वच्छता सुविधांच्या वापर न होने हे प्रमुख निर्देशांक असल्याचे यातून स्पष्ट होते. LIXIL व Oxford Economics India यांनी अलीकडेच केलेल्या अभ्यासातून असे लक्षात येते की सन 2015 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये 106 अब्ज अमेरीकन डॉलर्स चे नुकसान झाल्याचे दिसून आले, 5.2 टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर राहीला.
सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरोग्य पूर्ण अशा स्वच्छता सुविधांची उपलब्धता नसल्या कारणाने आज समाजात माहिलांना राज्यात दुय्यम स्थान प्राप्त होत आहे. शौचविधी साथ घरापासून दूरवर जाण्यामुळे मानसिक आणि शारीरीक ताण निर्माण होतो. याचबरोबर महिलांवर अनपेक्षित अतिप्रसंग  सुध्दा होवू शकतो. नैसर्गिक विधी वेळेत पूर्ण न केल्यामुळे विविध संक्रमणाचे आजार उदभवतात याचबरोबर गर्भावस्थेत धोका निर्माण होण्याची शक्यता देखील नकारता येत नाही. मासीक पाळी दरम्यान योग्य काळजी न घेतल्याने किशोर वयीन मुलींना विविध संसर्गजन्य आजारांना तोंड दयावे लागते, तर त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होतो.
युनिसेफ मुंबई यांच्या तांत्रिक सहाय्यातून मासीक पाळी व्यवस्थापनासंबंधी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आणि हागणदारी मुक्ततेच्या पुढील टप्यावरील बंधनकारक करून राज्यातील सर्व किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देण्याबाबत आज राज्यात मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा सोडण्याचे प्रमाण पुर्णपणे बंद करण्यासाठी प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वच्छता गृह आणि विशेष खोलीची व्यवस्था निर्माण करण्यासंबंधी शिक्षण विभागास विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर स्वच्छता घरातील
साफसफाई, सॅनीटरी पॅड ची उपलब्धता आणि पॅडच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सोईसुविधांची उपलब्धता करण्यात येण्यावर भर देण्यात येत आहे.स्वच्छतेची समस्या शाळेचा दैनदिन विषय बनून वैयक्तीक आणि सार्वजनीक स्वच्छतेसंबंधी त्यांना प्रशिक्षीत करणे महत्वाचे आहे.
तसेच महिला आणि बाल विकास विभाग, सार्वजनीक आरोग्य विभाग, ग्रामीण विकास विभाग, आदीवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग यांच्या सहयोगामुळे
स्वच्छता समस्या संबंधी एकात्मिक दृष्टीकोन निर्माण होवून काम करण्यास एक नवी दिशा मिळाली आहे.
हागणदारीमुक्त राज्याची निर्मिती हाच केवळ आपला उददेश नाही आहे तर स्वच्छतेच्या सर्व घटकांची योग्यरीत्या अंमलबजावणीस होण्यासाठी राज्याने यापूर्वीच ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. नागपूर, सातारा, सिधूदुर्ग, पुणे इ. जिल्हयांनी सांडपाणी आणि घनकचरा संसाधनाच्या व्यवस्थापनासाठी व मासीक पाळी व्यवस्थापनासाठी एकमेव्दितीय असा पुढाकार घेतला आहे. गावे हागणदारीमुक्त होवून हागणदारीत्तोर गावात विविध स्वच्छता कामांना मोठया प्रमाणात सुरूवात होईल या बाबत कोणतीही शंका असल्याचे कारण नाही.
स्वच्छता हा विषय व्यक्तिगत अथवा कौटुंबिक स्तरावर विचार करण्याचा विषय नाही. तर या अस्वच्छतेमुळे उघड्यावरील शौच प्रथेमुळे संपूर्ण सामाजिक हानी होते आहे या बाबत विचार होणे आवश्यक आहे. स्वच्छता हा शासकीय कार्यक्रम नसून, ती आपली व्यक्तिगत जबाबदारी आहे आणि ती पार पडताना प्रत्येकाने निर्माण केलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्याने स्वतःच करावे अशा प्रयत्नात शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.आपण सर्वानी कचरा निर्मितीचे प्रमाण कमी करायला हवे. तीन ‘R’ म्हणजेच Reduce, Reuse, आणि Recycle हे तीन शब्द शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी आदर्शवत आहेत आणि आपण सर्वानी त्याचे अनुकरण करायला हवे.
महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की स्वत:मध्ये सुधारणा करणे हा समाज सेवेतील सर्वात महत्वाचे आणि विश्वासाचे स्वरूप आहे. आज प्रत्येकाने निर्धार करून स्वत:ला आणि सभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवला तर संपूर्ण राज्य आणि देश आपोआपच स्वच्छ बनेल. मार्च 2018 अखेर संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. राज्यात यासाठी एक लोकचळवळ निर्माण व्हावी असे मला वाटते आणि असे केल्यास महात्मा गांधी यांचे स्वच्छ आणि समृध्द देशाचे स्वप्न ख-या अर्थाने जमीनीवर उतरेल असा मला विश्वास आहे आणि राज्याचे नागरीक निश्चितच देशाचे हे ध्येय साकार करण्यात शासनाची निराशा करणार नाहीत असा मला अखंड विश्वास आहे.

इर्शाद बागवान
सहायक संचालक