डॉ.महादेवराव मेश्राम यांना जीवन गौरव पुरस्कार

0
39

नवी दिल्ली 9 : महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या मंगला बनसोडे, नागपूर जिल्ह्याचे डॉ.महादेवराव मेश्राम, आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुलकर्णी यांचा समावेश आहे.येथील विज्ञान भवनात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने ‘वयोश्रेष्ठ सम्मान 2017’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री क्रिष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, सचिव जी. लता कृष्णराव या उपस्थित होत्या.

डॉ. महादेवराव मेश्राम यांना त्यांच्या आरोग्य सेवेत अतुलनिय योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री मेश्राम हे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालूक्यातील आहेत. त्यांनी नागपूरातील रोबर्टसन मेडीकल स्कूलमधून आरोग्य विषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केला. आणि 1958 पासून आरोग्य अधिकारी म्हणून रूजु झाले होते, त्यांनी रुग्णांना प्राधान्याने तपासले आहे. यासह आपत्ती काळात पुरग्रस्त क्षेत्रातील पिढीत लोकांसाठी, कुष्ठ रोग्यांसाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान महाराष्ट्र शासनाने ही केला असून त्यांना 1982-85 मध्ये प्रशस्ती पत्राने सन्मानित करण्यात आले आहे. ते आजही रूग्णांना तपासतात. त्यांच्या या सर्व कामाचा सन्मान म्हणुन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.