पोवार समाज कोजागिरी कार्यक्रमात गुणवंत विद्याथ्र्यांसह इतरांचा सत्कार

0
12

गोंदिया दि.१०–पंरपरेनुसार साजरा केल्या जाणाèया पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे ७ सप्टेंबरला पोवार समाजाच्या शरद पोर्णिमा कार्यक्रमाला रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने बहार आणली व उपस्थितांना खिळवून ठेवले.कार्यक्रम पवार प्रगतीशील मंच, श्री प्रगतीशील शिक्षण संस्था, पवार नवयुवक समिती, पवार महिला समिती, पोवार नवरात्र गरबा उत्सव समिती, पोवार समाज संघटन शास्त्री वार्ड, क्षत्रिय राजाभोज समाज समिती फूलचूर पेठ यांच्यासयुंक्तवतीने पार पडला.अध्यक्षस्थानी पवार प्रगतीशील मंचचे माजी अध्यक्ष राजेश राणे होते. उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.ओसाराम तुरकर, स्वागताध्यक्ष डॉ. कैलास हरिणखेडे, प्रमुख अतिथी डॉ.डी.सी.पटले, सेवानिवृत्त प्राचार्य लिलाधर पटले, ईश्वरदयाल गौतम, डी.यू.रहांगडाले, अनिल टेंभरे, भुवन बिसेन, राजेश चौहान यांच्या हस्ते समाजभूषण राजाभोज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.संचालन निकिता भगत व मोनिका चौधरी यानी केले.याप्रसंगी विकास बघेले, पुजा तुरकर, आचल बघेले, साय ठाकरे, वैष्णवी पारधी, अनुष्का येळे, जयश्री कटरे,निहारिका बिसेन,अनुभव तुरकर, आस्था टेंभरे, ओजल रहांगडाले, वैष्णवी रहांगडाले, काव्या रहांगडाले, संस्कृति बिसेन, श्रृती रहांगडाले, ममता तुरकर, दानेश कटरे यांनी नृत्य व पोवारी गीत सादर केले.त्यानंतर अतिथींच्या हस्ते स्व.बी.एम. पटेल स्मृति पुरस्कार, स्व.रामचंद्र हरिणखेडे स्मृति पुरस्कार, स्व.मुन्नालाल चव्हान स्मृति पुरस्कार व स्व.देवेंद्रभाऊ बिसेन स्मृति पुरस्कारासोबत पीएमटी,पीईटी तसेच १० वी व १२ वी च्या परीक्षेत ९० टक्केपेक्षा अधिक गुण घेणाèया विद्याथ्र्यांचा व पालकांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.उत्कृष्ट कार्य करणाèयांचा गौरव करण्यात आला.
उद्घाटक डॉ.ओसाराम तुरकर यांनी समाजाची संस्कृती व भाषा जपून ती पुढच्या पिढीपर्यंत जाईल यासाठी समाज बांधवांना कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ पोवार समाज विद्याथ्र्यांसाठी वसतीगृहासाठी १ लाख ११ हजार रूपये देणगी देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश राणे यांनी समाज विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करून मतभेद असावे मात्र मनभेद नसावे असे मनोगत व्यक्त केले.शरद पोर्णिमा कार्यक्रमानिमित्ताने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी विजेते क्रिकेट- उद्देश रहांगडाले व अविनाश कटरे, बॅटqमटन मुले- अवन टेंभरे, सजल टेंभरे, बँडqमटन मुली मोनिका चौधरी व निकिता भगत, रांगोळी स्पर्धा- जयश्री कटरे, पुनम भगत, सविता तुरकर, शतरंज स्पर्धा- मोहक बोपचे, मटकी फोडो स्पर्धा-सेजल बिसेन व लंगडी स्पर्धेतील आरती तुरकर व सोनाली रहांगडाले तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना श्री पवार प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चौहान,उपाध्यक्ष सुरेश भ्नतवर्ती व सचिव प्रा.किशोर भगत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यातत आले.संचालन पवार प्रगतीशील मंचचे सचिव डॉ.संजीव राहंगडाले तर आभार सहसचिव प्रा.राजू बोपचे यांनी मानले.