२०१८ मध्ये लागोपाठ सुट्ट्याच सुट्या

0
16

गोंदिया,दि.07 : 2018 वर्षात कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 2018 या वर्षात एक दोन नाही तर किमान 10 वेळा सलग आणि मोठ्या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.ज्या कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवार सुट्ट्या आहे त्यांना 12 महिन्यांत किमान 10 वेळा सलग तीन-चार दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहेत.याचा सर्वाधिक फायदा सरकारी कर्मचारी आणि ज्यांना शनिवार, रविवार सुट्ट्या आहेत त्यांना होणार आहे.

कशा असतील सुट्ट्या :

जानेवारी 2018

२२ जानेवारी सोमवार – वसंत पंचमी

(२० आणि २१ जानेवारीला शनिवार, रविवार असल्याने ३ दिवस सुट्टी)

२६ जानेवारी शुक्रवार – प्रजासत्ताक दिन

(२७ आणि २८ जानेवारीला शनिवार, रविवार असल्याने ३ दिवस सुट्टी)

मार्च 

२ मार्च शुक्रवार – धूलिवंदन

(३ आणि ४ मार्च शनिवार, रविवार असल्याने सलग 3 दिवस सुट्टी)

२९ मार्च गुरुवार – महावीर जयंती

३० मार्च शुक्रवार – गुड फ्रायडे

(३१ मार्च आणि १ एप्रिलला शनिवार, रविवार असल्याने सलग ४ दिवस सुट्टी)

एप्रिल

३० एप्रिल सोमवार – बुद्ध पौर्णिमा

१ मे मंगळवार – कामगार दिन

(ज्यांना शनिवार, रविवार सुट्टी आहे त्यांना सलग चार दिवस सुट्टी)

जून

१५ जून शुक्रवार – रमजान ईद

(शनिवार, रविवार सुट्टी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्टी)

ऑगस्ट

२२ ऑगस्ट बुधवार – बकरी ईद

२४ ऑगस्ट शुक्रवार – ओनम

२६ ऑगस्ट रविवार – रक्षाबंधन

(शनिवारी सुट्टी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्टी मिळणार)

सप्टेंबर

३ सप्टेंबर सोमवार – जन्माष्टमी

(शनिवार, रविवार असल्याने पुन्हा सलग ३ दिवस सुट्टी)

१३ सप्टेंबर गुरुवार – गणेश चतुर्थी

(गुरूवारपासून सलग ४ दिवसांची सुट्टी)

ऑक्टोबर

१८ ऑक्टोबर गुरुवार – राम नवमी

१९ ऑक्टोबर शुक्रवार – दसरा

(२०, २१ ऑक्टोबरला शनिवार, रविवार असल्याने सलग ४ दिवस सुट्टी)

नोव्हेंबर

७ नोव्हेंबर बुधवार – दिवाळी

८ नोव्हेंबर गुरूवार – पाडवा

९ नोव्हेंबर शुक्रवार – भाऊबीज

१० नोव्हेंबर शनिवार

११नोव्हेंबर रविवार

(सलग ५ दिवस सुट्टी)