जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा शुक्रवारी

0
26

गोंदिया : राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणतज्ज्ञ स्व. कमलाकरराव इंगळे यांच्या जयंतीनिमित्त नि:शुल्क जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (दि.१३) दुपारी २ वाजता नूतन विद्यालय, सिव्हिल लाईन्स, गोंदिया येथे करण्यात आले आहे.
सदर चित्रकला स्पर्धेसाठी चार गट तयार करण्यात आले आहे. पहिल्या गटात वर्ग चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना दिलेल्या चित्रात रंग भरायचे आहे. दुसर्‍या गटात वर्ग पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे.
त्यांच्यासाठी आपला आवडता पक्षी किंवा प्राणी, आपला आवडता काटरून व कोणतेही नैसर्गिक दृश्य, असे तीन विषय आहेत. तिसर्‍या गटात वर्ग आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहणार असून त्यांच्यासाठी गो मातेचे पूजन, वाढदिवसावर वृक्षारोपण, स्वच्छता-सर्वांचे कर्तव्य, असे तीन विषय आहेत. चौथ्या गटात सर्व वयोगटांचा समावेश असून प्रदूषण निवारण, मानवता सर्वात महान, समाजसेवा सर्वांच्यासाठी इत्यादी विषय ठेवण्यात आले आहेत.
सर्व स्पर्धकांना ड्राईंग शिट देण्यात येणार असून दिलेल्या विषयावर चित्र तयार करून रंग भरावयाचे आहे. पहिल्या गटासाठी वॅक्स क्रेयॉन्स किां कलर पेन्सिल तसेच दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या गटांना वॅक्स क्रेयान्स, पोस्टर कलर, वॉटर कलर किंवा कलर पेन्सिल यापैकी कोणत्याही एका रंगाचा उपयोग करून चित्र तयार करावयाचे आहे. स्पर्धकांना ड्राईंग बोर्ड, पर्याप्त रंग व ब्रश आपल्या सोबत आणायचे आहे.
स्पर्धेनंतर त्वरितच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. सर्व गटांतील प्रथम, द्वितीय, तृतीय व २0 प्रोत्साहन पुरस्कार तसेच सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील.
जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्था सचिव अमृत इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नूतन विद्यालय कार्यालय, सिव्हिल लाईन्स, गोंदिया येथे संपर्क साधावा.