डव्वा येथे रविवारला चक्रवती राजाभोज जयंती समारोह

0
20

सडक अर्जुनी,दि.२२: क्षत्रीय राजाभोज पोवार सांसकृतीक पर्यटन केंद्र सडक अर्जुनीच्यावतीने डव्वा येथील राजाभोज नगरी परिसरात पोवार ईरा व राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन रविवार २८ जानेवारी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता राजाभोज qदडीचे उद्घाटन माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांच्या हस्ते राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभाध्यक्ष डॉ. बी.एम. शरणागत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून उमेश देशमुख उपस्थित राहणार आहेत. समारोहाचे उद्घाटन गणेश पटले यांच्या हस्ते नागपूर पोवार समाज कृती समितीचे अध्यक्ष किसना देवासे यांच्या अध्यक्षतेखाली स्वागताध्यक्ष मोतीलाल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला रविकांत बोपचे, यशवंत रहांगडाले, प्रल्हाद पटले, संज़य टेंभरे, विजय पारधी, प्रफुल टेंभरे, अजय खवसे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज व कृषी या विषयावर रुची अग्रोचे महेंद्र ठाकुर, समाज व ओबीसी आरक्षण यावर ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, शास्वत समाज व कौशल्य विकास या विषयावर मनोज चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला समस्त बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.