अमित शहांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये अदानींनी आवरता आला नाही सेल्फीचा मोह!

0
18

अहमदाबाद- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय आणि सून रिशिताच्या रिसेप्शनला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दिली. उद्योगपती गौतम अदानींनी नवदाम्पत्याला आर्शीवाद दिला. नंतर स्टेजवरून खाली उतरून अन्य लोकांसोबत त्यांनी सेल्फी घेतला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नाही. विवाहाला देखील मोदी आले नव्हते.अहमदाबादमधील कर्णावती क्लबच्या हिरवळीवर 12 फेब्रुवारीला सायंकाळी जय आणि रिशिलाचे रिसेप्शन झाले. यावेळी सौरभ पटेल, सुरेंद्र पटेल, परेश रावल, मीनाक्षी पटेल, पीयूष गोयल, प्रदीप सिंह जडेजा, पर्वत पटेल, परीमल नाथवानी, पंकज पटेल, के. कैलाशनाथन, डीजीपी पीसी ठाकुर, विपुल चौधरी, केशुभाई पटेल, करसनभाई पटेल यांच्यासह जवळपास साडे सहा हजार पाहुणे उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाला भाजपचा एकही मोठा चेहरा दिसला नाही. दिल्लीत 15 फेब्रुवारीला रिसेप्शन आयोजित केले आहे. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

अडानीना आवरता आला नाही सेल्फीचा मोह…
अमित शहा स्वत: नवदाम्पत्यासोबत स्टेजवर उभे राहून पाहुण्यांना अभिवादन करत होते. रिसेप्शनदरम्यान उद्योगपती गौतम अदानींनी वर-वधूला आशीर्वाद दिले. स्टेज घाली उतल्यानंतर अनेक लोकांसोबत अदानींनी सेल्फी घेतले.
खानपानची व्यवस्था वेगवेगळी…
रिसेप्शनला आलेल्या व्हीआयपी आणि आम लोकांसाठी खानपानाची व्यवस्था वेगवेगळी करण्‍यात आली होती. पाहुण्यांसाठी 40 फूड काउंटर्स उभारण्यात आले होते. त्यात टोमॅटो बेसिल सूप, स्वीट कॉर्न व्हेज, ब्रेड बास्केट, इंडियन बार्बेक्यू, कॉर्न पार्सल, टँगी सलाद, कोल्ड पास्ता सलाद, वॉटरमेलन ज्यूस, ऑरेंज ज्यूस, ग्रीन चना चाट, गाजराचा हलवा, स्प्रिंग रोल, गाटा सब्जी, बटी, राजस्थानी दाल, नवरत्न कोरमा, डाळ-भात, जलेबी-रबडी, पूरी, पराठा, आईसक्रीम या पदार्थांचा समावेश होता.